विशाखापट्टनममधील एका कंपनीतून घातक गॅस गळती, 30 महिलांची प्रकृती गंभीर

एसपी गौतम साली यांनी पुढे म्हटले की, या घटनेची चौकशी सुरु आहे. जर कंपनीकडून कोणताही चूक झाल्य़ाची माहिती चौकशीत समोर आली तर योग्यती कारवाई केली जाईल.

report 30 woman fell in due dangerous gas leak company visakhapatnam
विशाखापट्टनममधील एका कंपनीतून घातक गॅस गळती, 30 महिलांची प्रकृती गंभीर

आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) विशाखापट्टनममधील एक कंपनीतून घातक गॅस गळती (Gas Leak) झाल्याची घटना समोर आली आहे. या गॅस गळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या ३० महिलांची प्रकृती बिघडली आहे. गंभीर अवस्थेतील या महिलांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना अत्चुतापुरम येथील Foras लॅबॉरेट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत घडली आहे.

विशाखापट्टनमचे (Visakhapatnam) एसपी गौतमी साली यांनी सांगितले की, सध्या सर्व महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे, कोणाचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. या गॅस गळतीमुळे कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा चक्कर येऊ लागली त्यानंतर उलट्या सुरु झाल्या. यात 30 महिलांची प्रकृती बिघडली आहे.

एसपी गौतम साली यांनी पुढे म्हटले की, या घटनेची चौकशी सुरु आहे. जर कंपनीकडून कोणताही चूक झाल्य़ाची माहिती चौकशीत समोर आली तर योग्यती कारवाई केली जाईल. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनास्थळी अनेक बडे अधिकारी दाखल झाले आहेत.

आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टनममधील गॅस गळतीची ही एका महिन्यातील दुसरी घटना आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका प्लांटमध्ये अचानक स्टाइरीन गॅस लीक झाल्य़ाची भीषण घटना घडली. एनडीआरएफने विशाखापट्टनम गॅस गळतीदरम्यान 11 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान विशाखापट्टनममध्ये गॅस गळतीच्या घटनांमुळे आत्तापर्यंत 5000 हून अधिक लोक आजारी पडले आहेत.


Covid Vaccine : देशातील पहिल्या Intranasal Vaccine च्या फेज-2 ट्रायलला मंजुरी, आता मानवावर होणार चाचणी