घरCORONA UPDATEवर कोट खाली हाफ पँट, रिपोर्टरचं वर्क फ्रॉम होम!

वर कोट खाली हाफ पँट, रिपोर्टरचं वर्क फ्रॉम होम!

Subscribe

कोरोनाच्या संकटामुळे सध्य जगभरात लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. अशामध्ये अत्यावश्यक सेवेत असणारे मात्र अहोरात्र काम करत आहेत. यात प्रसार माध्यमांचाही समावेश होतो. त्यामुळे न्यूज चॅनेल्स, न्यूज वेबसाइट्स, काही प्रमाणात वृत्तपत्र हे सुरू आहेत. २४ तास बातम्या देणाऱ्या न्यूज चॅनेल्सच्या अँकरला स्टुडिओमध्ये येऊन काम करावे लागत आहे. मात्र रिपोर्टर्स हे लॉकडाऊनमुळे घरातूनच बातमी मिळवून ती माध्यमांपर्यंत पोहोचवत आहेत. अशात वर्क फ्रॉम होम करणाऱ्या एका रिपोर्टरचा मजेदार व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. चॅनेलसाठी सूट परिधान करून घरातून माहिती देणाऱ्या या रिपोर्टरने त्या खाली केवळ हाफ पँट घातल्याचे यात पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

‘गुड मॉर्निंग अमेरिका’ या शोमध्ये एबीसीचा एक रिपोर्टर सूट पण हाफ पँट परिधान केलेला पाहायला मिळाला. दिवंगत सुपरमॅन स्टार क्रिस्टोफर रीव्ह यांचा मुलगा व्हिल रीव या कार्यक्रमासाठी शोमध्ये उपस्तित होते. ज्यात त्यांनी एका नवीन उपक्रमाची चर्चा केली असून ज्यात वयोवृद्ध रुग्णांना औषधे लिहून देणारे ड्रोन दिसतात. मात्र यातील मजेदार क्षणाचे ट्विटही रीव यांनी केले आहे.

बॉलीवूडकरांचेही मजेदार किस्से 

बॉलीवूडच्या पीके चित्रपटात अभिनेता बोमन इराणी यांनीही अशा पद्धतीने न्यूज अँकरींग केले होते. शोमध्ये वरती सूट घातलेले बोमन खरंतर केवळ ट्रॅक पँट घालून शो करत होते. हा मजेदार सिन पाहून प्रेक्षकांना हसू आवरले नव्हते. तर अभिनेता सोहल खान यानेही अनेकदा कॉमेडी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत असताना केवळ शॉर्ट पँट परिधान करून बसणे पसंत केले आहे. त्यावर कॉमेडी किंग कपिल शर्मा याने शोमध्ये बरेचदा टिपण्णीही केली आहे.

- Advertisement -
बोमन ईराणी पीके चित्रपटात 

हेही वाचा –

धारावीमध्ये १४ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या ३४४ वर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -