घरताज्या घडामोडीसोनिया गांधींबद्दलची ती चर्चा खोटीच - रणदीप सुरजेवाला

सोनिया गांधींबद्दलची ती चर्चा खोटीच – रणदीप सुरजेवाला

Subscribe

२०१४ आणि त्यापाठोपाठ २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा राष्ट्रीय पराभव झाला. २०१४पेक्षाही मोठ्या फरकाने २०१९मध्ये काँग्रेसला भाजपनं धोबीपछाड दिली. त्यासोबतच देशातल्या इतर राज्यांमध्ये देखील काँग्रेसची कामगिरी काही फारशी चांगली राहिली नाही. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधल्या काही माजी मुख्यमंत्र्यांसह एकूण २३ नेत्यांनी थेट पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच पत्र लिहिलं होतं. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या संरचनेमध्ये बदल करण्यासोबतच पक्षाच्या नेतृत्वाविषयी देखील उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Interim President Sonia Gandhi) पदावरून पायउतार होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. नेत्यांच्या पत्राला उत्तर देताना सोनिया गांधींनी तसा उल्लेख केल्याचं देखील सांगितलं जात होतं. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिलं आहे.

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पदावरून पायऊतार होणार असल्याच्या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसून हे वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण सुरजेवाला यांनी दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये नक्की चाललंय काय? या प्रश्नावर चर्चा होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरापासून राहुल गांधी पायऊतार झाल्यापासून सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाचा कारभार हाकत आहेत. मात्र, पक्षाला भाजपसारख्या कडव्या आव्हानासमोर टिकाव लावायचा असेल, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात बदल करणं गरजेचं असल्याचं मत नेत्यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये व्यक्त करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता उद्या २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय घडतं आणि काय निर्णय घेतले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -