घरदेश-विदेशRepublic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज ! काय आहे...

Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज ! काय आहे वैशिष्ट्ये ?

Subscribe

चित्ररथावर कास पठार पाहायला मिळेल. विदर्भामध्ये आढळणारा पट्टेरी वाघ चित्ररथावर स्वार आहे.त्यातील विविध फूल आणि सरडा सुपरबा ही जात दाखवण्यात आले आहे.

अवघ्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे.(Republic Day 2022)आतापर्यंत भारतात प्रजासत्ताक दिन हा 24 जानेवारीपासून साजरा करण्यात येत होता मात्र, आता 24 जानेवारीपासून साजरा करण्यात येणारा प्रजासत्ताक दिन हा 23 जानेवारीपासून साजरा करण्यात येत आहे. दिल्लीच्या राजपथावर झळकण्यासाठी 12 राज्यांची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्राचं वैभव पुन्हा एकदा दिल्लीतील राजपथावर दिसणार आहे.दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर सांस्कृतीक कार्यक्रमांचा सोहळा पार पडतो. यावेळी आपल्या भारतीय  सैन्याकडून कला कौशल्यासह आपल्या सैन्याची ताकद दाखवण्यात येते यासह प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे दर्शन होत असते.(republic day 2022 maharashtra chitrarath)

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. तसेच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दरम्यान महाराष्ट्राची जैवविवीधता ही यंदाच्या चित्ररथाची वैशिष्ट्य असणार आहे. महाराष्ट्राचा हा चित्ररथ नेमका कसा आहे याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. यंदाच्या राजपथावरील महाराष्ट्राच्या विशेष चित्ररथाबद्दल तसेच याची वैशिष्ट्य काय आहेत जाणून घेऊयात

- Advertisement -

 

महाराष्ट्राची जैवविविधता रापथावर झळकणार

प्रजासत्ताक दिनाला राजपथावर जी परेड असते त्यामध्ये राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ झळकणार आहे. महाराष्ट्रातील जैवविविधता ही यंदाच्या चित्ररथाची थिम आहे. या चित्ररथावर महाराष्ट्र असं मध्यभागी लिहण्यात आलं असून यावर ब्लू मॉमॉन फुलपाखरू देण्यात आले आहेत. सांस्कृतिक विभागेच सचिव चौरे यांनी चित्ररथाबद्दल माहिती दिली आहे.

- Advertisement -

 

चित्ररथाची  वैशिष्ट्ये 

चित्ररथावर ब्लू मॉमॉन  राज्याने घोषित केलेलं पहिलं फुलपाखरू असून हे भिमाशंकरमध्ये आढळणारे फुलपाखरू आहे. अशा प्रकारचे 8 फुलपाखरू चित्ररथावर असतील. तसेच चित्ररथावर कास पठार पाहायला मिळेल. विदर्भामध्ये आढणारा पट्टेरी वाघ चित्ररथावर स्वार आहे.त्यातील विविध फूल आणि सरडा सुपरबा ही जात दाखवण्यात आले आहे. राज्य प्राणी शेखरुची प्रतिमा देखील दाखवण्यात आली आहे. हा प्राणी महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. राज्याचा पक्षी हरियाल त्याला पिवळं कबुतर म्हणतात ते दाखवण्यात आले आहे. वाघाला , माळढोक पक्षी , नव्याने सापडलेला खेकडा गुबर नटोरिया ठाकरियाना देखील दाखवण्यात आला आहे. आजादी का अमृत मोहोत्सवाअंतर्गत महाराष्ट्राने अतापर्यंत प्रर्यावरणात केलेली प्रगती यात मांडण्यात आली असून चित्ररथ साकार करण्यासाठी ‘शूभ आर्ट’ नागपूर येथील टिमला चित्ररथाचे टेंडर देण्यात आले आहे. चित्ररथ साकारण्यासाठी तब्बल 30 लोकांनी यासाठी मेहनत केली आहे.

यंदाच्या 12 राज्याच चित्ररथासाठी सिलेक्शन झालं असून यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश करण्यात आला असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जातेय.


हे हि वाचा – ममतांना नकार मात्र ठाकरेंचा चित्ररथ राजपथावर दिसणार, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -