महारेराअंतर्गत नोंदणी असलेल्या प्रकल्पांना मिळणार मुदतवाढ

महारेराने आज कोव्हिड १९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे फोर्स मेजरची घोषणा केली. यामुळे महारेराअंतर्गत नोंदणी असलेल्या प्रकल्पांना मुदतवाढ मिळणार आहे.

maharera
महारेरा

महारेराने आज कोव्हिड १९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे फोर्स मेजरची घोषणा केली. यामुळे महारेराअंतर्गत नोंदणी असलेल्या प्रकल्पांना मुदतवाढ मिळणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या अंतिम मुदतीमध्येही वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्या आदेशान्वये महारेराने हा अध्यादेश जारी केला आहे.

आगामी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मिळणार

देशभरात तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत कामगार हे त्यांच्या मूळगावी गेले आहेत. तसेच काही घरी जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे देशातील सर्वच भागात विविध प्रकल्पाअंतर्गत बांधकाम ठप्प झाले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय सल्लागार समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत केंद्राकडून रेरा नोंदणी असलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी मुदतवाढ देण्याचे निश्चित करण्यात आले. समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आता रेरा नोंदणी असलेल्या प्रकल्पांसाठी आगामी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मिळणार आहे. महारेरा स्वतःच्या अधिकारात तीन महिन्यांची मुदतवाढ देणार आहे.

लॉकडाऊनमुळे लागू झालेला फोर्स मेजर १५ मार्चपासून आगामी सहा महिन्यांसाठी लागू झालेला आहे. येत्या १४ सप्टेंबरपर्यंत हा फोर्स मेजर लागू असणार आहे. केंद्रीय सल्लागार समितीला अनेक पातळीवर मुदतवाढ करण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. याच अर्जांव निर्णय घेत रिअल इस्टेट प्रकल्पांअंतर्गत मुदतवाढ देण्याचा आदेश महारेराने जारी केला आहे. कोरोनासारख्या नैसर्गिक संकटामुळेच ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच महारेरासारख्या नियामक आयोगांना ही मुदतवाढ तीन महिन्यांनी वाढवता येतील असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. महारेरालाही यामुळे अधिकार मिळाले आहेत. महारेरा सुओमोटो पद्धतीने एखाद्या प्रकल्पाची मुदतवाढ तीन महिने देण्यासाठीचे अधिकार आहेत. ज्या प्रकल्पांना कोरोनाचा जास्त फटका बसला आहे अशा प्रकल्पांची मुदतवाढ ही आगामी सहा महिन्यांसाठी वाढवण्याचे अधिकार महारेराला देण्यात आले आहेत.


हेही वाचा – Video : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर झाला हेअर स्टायलिस्ट