घरदेश-विदेशहिमाचलमध्ये फिरायला गेले आणि रोपवेमध्ये अटकले

हिमाचलमध्ये फिरायला गेले आणि रोपवेमध्ये अटकले

Subscribe

तांत्रिक बिघाड झाल्याने ही केबल कार (Rope Way) अडकली होती, असं सांगण्यात येतंय.

हिमाचल प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परवानू टिंबलमध्ये (केबल कार) काही प्रवासी अडकून पडले होते. तांत्रिक बिघाड झाल्याने ही केबल कार (Rope Way) अडकली होती, असं सांगण्यात येतंय. (Rescue operation underway at Parwanoo Timber Trail where a cable car trolly with tourists is stuck mid-air)

हेही वाचा – Jharkhand ropeway accident : झारखंडच्या रोप वे हेलिकॉप्टर रेस्क्यू दरम्यान महिला कोसळली

- Advertisement -

केबल कार मध्येच अडकून पडल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून तत्काळ मदतकार्य करण्यात आले. यामुळे या कारमधील दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आले तर, अद्यापही या कारमध्ये नऊ जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित पर्यटकांना काढण्यासाठी एनडीआरएफची टीम पोहोचणार असल्याचं सांगण्यात येतंय.

- Advertisement -

देवघर अपघातात तिघांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून रोप वे मुळे अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार झारखंड येथील देवघर येथील त्रिकुटाजवळ झालेल्या रोपवेच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. बचावकार्यासाठी भारतीय लष्कर, हवाई दल, एनडीआरएफ, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि जिल्हा प्रशासन यांनी एकत्रितपणे कार्य केले. ४६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तांत्रिक कारणामुळेच हा अपघात झाल्याचं समोर आलं. या घटनेनंतर आता पुन्हा हिमाचल प्रदेशमध्ये असाच प्रकार घडल्याने अशा ट्रॉलीमधून प्रवास करणे धोक्याचं ठरू लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -