घरदेश-विदेशकोरोना विषाणूवर Nasal Vaccine प्रभावी; उंदरांवरील चाचणी यशस्वी

कोरोना विषाणूवर Nasal Vaccine प्रभावी; उंदरांवरील चाचणी यशस्वी

Subscribe

देशात कोरोनाचा कहर अद्याप पूर्णतः नष्ट झालेला नाही. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयावह असल्याने यादरम्यान कोरोना संसर्ग अटोक्यात राहावा यासाठी देशभरात लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कोरोना विषाणूवर Nasal Vaccine प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. कोरोना वरील एकच डोस आवश्यक असणारी लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीची यशस्वीपणे उंदरांवर चाचणी घेण्यात आली. संशोधनाच्या मते, हे उंदरांना प्राणघातक संक्रमणापासून वाचविण्यासह सार्स-कोव्ह -२ च्या प्रसारास प्रतिबंधित करते. सायन्स अ‍ॅडव्हान्सस या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, ज्याप्रमाणे इन्फ्लूएंझाविरूद्ध देण्यात येणारी लस असते, त्याप्रमाणे ही नवीन लस नाकाद्वारे देण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या जॉर्जिया विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल मॅक्रे यांनी सांगितले की, सध्या उपलब्ध कोरोना लस अत्यंत प्रभावी आहे, परंतु अद्याप जगातील अधिकाधिक लोकांना ही लस मिळू शकलेली नाही, म्हणूनच एक लस देण्याची गरज आहे. ही लस घेणे सोपे आहे आणि संक्रमणाचा प्रसार रोखण्यास देखील मदत होणार आहे. जर कोरोनाची ही नवी स्प्रे लस मानवांवर परिणामकारक ठरली तर कोरोना संसर्ग पसरण्यापासून मदत होऊ शकते. संशोधकांना असे आढळले की, लसीचा एक डोस पुरेसा आहे आणि कमीतकमी तीन महिन्यांपर्यंत सामान्य तापमानात ही लस साठविली जाऊ शकते.

- Advertisement -

दरम्यान, सार्स-सीओवी-२ स्पाइक प्रोटीन पेशींमध्ये वितरित करण्यासाठी लस एक हानीकारक पॅराइनफ्लुएंझा व्हायरस ५ म्हणून दिली जाते. जी रोगप्रतिकारक प्रतिक्रियेद्वारे कोविड संसर्गापासून संरक्षण करते. या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, या लसीमुळे उंदीरांमधील कोविडच्या विरूद्ध प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे. या लसीमुळे फेरेट्समध्ये संसर्ग देखील रोखला जाण्याची अधिक शक्यता आहे. नाकाद्वारे दिलेली ही लस म्युकोसेलवर लक्ष्य करते, ज्याद्वारे प्रामुख्याने कोरोना संसर्ग शरीरात प्रवेश करते आणि येथून विषाणू स्वतःच पसरतो. येथून व्हायरस शरीरात पोहोचतो आणि थेट फुफ्फुस आणि शरीराच्या इतर भागास लक्ष्य करतो, ज्यामुळे हा रोग आणखी गंभीर आणि जीवघेणा बनतो.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -