घरताज्या घडामोडीकोरोना झाल्यानंतर शरीरात किती दिवस अँटीबॉडीज राहतात?; वैज्ञानिकांनी केला खुलासा

कोरोना झाल्यानंतर शरीरात किती दिवस अँटीबॉडीज राहतात?; वैज्ञानिकांनी केला खुलासा

Subscribe

जाणून घ्या कोरोना रुग्णांच्या शरीरात किती काळ अँटीबॉडीज राहतात?

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला कोरोनाचे वाढते आकडे पाहून चिंता वाढत आहे. कोरोनाच्या या लढाईत सर्वात मोठे अस्त्र लसीला मानले जात आहे. यादरम्यान इटलीच्या वैज्ञानिकांनी कोरोना झाल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज (Antibodies) संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. वैज्ञनिकांच्या मते कोरोनामुक्त झाल्यानंतर आठ महिन्यांपर्यंत रुग्णांच्या रक्तात कोरोना विरोधातील अँटीबॉडीज राहतात.

दरम्यान कोरोना रुग्णांवर सातत्याने नजर ठेवणाऱ्या संशोधकांनी सांगितले की, शरीरात कोरोना विरोधातील अँटीबॉडीज असेपर्यंत व्हायरसचा धोका कमी आहे. मिलानमधील सॅन राफेल रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोना रुग्णांमध्ये जे अँटीबॉडीज तयार होतात, त्या रुग्णांचे वय आणि रोग असूनही रक्तात ते असतात. अशा परिस्थितीत रुग्णाला कोणत्याही व्हायरसमुळे आजारी पडण्याचा धोका खूपच कमी होतो.

- Advertisement -

इटलीचे ISS नॅशनल हेल्थ इंस्टिट्यूटसोबत मिळून काम करणारे संशोधकांनी या अभ्यासासाठी कोरोनाची लक्षणे असलेल्या १६२ रुग्णांची निवड केली होती, ज्यांना गेल्या वर्षी आलेल्या कोरोना लाटेदरम्यान संसर्ग झाला होता. यांच्या रक्ताचे नमुने सर्वात पहिल्यांदा मार्च आणि एप्रिलमध्ये घेतले. यानंतर जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांच्या रक्ताचे नमुने नोव्हेंबरमध्ये पुन्हा घेण्यात आले. ISSसोबत जारी केलेल्या निवेदनात संशोधकांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुढील आठ महिन्यांपर्यंत या रुग्णांच्या शरीरात व्हायरससोबत लढण्यासाठी अँटीबॉडीज आढळले. संशोधकांच्या हा अभ्यास ‘नेचर कम्युनिकेशन्स साइंटिफिक जर्नल’मध्ये प्रकाशित केला गेला आहे. काही रुग्णांमधील अँटीबॉडी अनेक दिवसांसाठी असता, असे शोधात आढळले. संशोधकांनी अभ्यासात कोरोना रिकव्हरीमध्ये अँटीबॉडीज विकसित होण्याच्या महत्त्वावर अधिक जोर देण्यात आला आहे.


हेही वाचा – Corona Update: देशात मृत्यूचा तांडव सुरुच; २४ तासांत ४१२० जणांचा मृत्यू, ३.६२ लाख नव्या रुग्णांची नोंद


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -