घरदेश-विदेश'या' २१ औषधांमुळे CoronaVirus चा फैलाव रोखण्यास होते मदत!

‘या’ २१ औषधांमुळे CoronaVirus चा फैलाव रोखण्यास होते मदत!

Subscribe

शास्त्रज्ञ प्राण्यांवर या औषधांची चाचणी करत असून जर ते प्रभावी सिद्ध झाले तर शास्त्रज्ञ COVID-19 च्या उपचारांसाठी क्लिनिकल चाचण्यांसाठी एफडीएची परवानगी घेतील

जगभरात कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी सुरू आहे. दरम्यान, शास्त्रज्ञांना अजून एक मोठे यश मिळाले आहे. शास्त्रज्ञांनी असे २१ औषधे शोधली आहेत जी आधीपासून उपलब्ध असून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून रोखतात. म्हणजे, ही औषधे एका कोरोना विषाणूपासून दूसरा विषाणू तयार होण्यापासून रोखू शकतात. सॅनफोर्ड बर्नहम प्रिबाईस मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन कोरोना विषाणूच्या उपचारात मदत करू शकते. कोरोना विषाणूची प्रतिकृती रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी औषधांच्या सर्वात मोठ्या संग्रहातून हे विश्लेषण केले आहे. प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये, अँटीव्हायरल अॅक्टिव्हिटी असलेले १०० रेणू (molecules)आढळले आहेत.

हा अभ्यास नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. अभ्यासानुसार यातील २१ औषधे विषाणूला पुन्हा तयार होण्यापासून प्रतिबंध करतात आणि ही औषधे रुग्णांसाठी सुरक्षित आहेत. यापैकी चार संयुगे रामडिसविर एकत्रित करून COVID-19 वर उपचार केला जाऊ शकतो. सॅनफोर्ड बर्नहॅम प्रिबाईस येथे अभ्यासाचे ज्येष्ठ लेखक आणि रोग प्रतिकारशक्ती कार्यक्रमाचे संचालक सुमित चंदा म्हणाले, “रेमेडिसिव्हिर औषध रुग्णालयात रूग्णांच्या रिकव्हरी वेळ कमी करण्यास सक्षम आहे, परंतु हे औषध सर्व लोकांवर कार्य करत नाही.” तसेच अद्यापही स्वस्त, प्रभावी आणि सहज उपलब्ध औषधे आहेत जी रेमेडिसिव्हिरसह पूरक असू शकतात आणि जेव्हा संसर्गाची पहिली लक्षणे पाहिली जातात तेव्हाच दिली जातात.

- Advertisement -

या अभ्यासामध्ये, शास्त्रज्ञांनी विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींच्या फुफ्फुसांच्या बायोप्सिसवरील औषधांच्या परिणामाची देखील तपासणी केली. याशिवाय रेमेडिसिव्हिरसह इतर औषधांचे मूल्यांकनदेखील करण्यात आले. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, या २१ औषधांमधून एक विषाणूपासून दूसरा विषाणू होण्यापासून रोखणारी १३ औषधे आधीच क्लिनिकल ट्रायल​​मध्ये आहेत आणि असे मानले जाते की कोविड -१९ रूग्णांवर उपचार करण्यास ते प्रभावी आहेत.

शास्त्रज्ञांनी सांगितले की यापैकी २ औषधांना यापूर्वीच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मान्यता दिली आहे. ही औषधे एस्टीमेटिझोल (Astemizole) आणि क्लोफाझॅमिन (Clofazamine) आहेत तर आपत्कालीन परिस्थितीत रेमेडिसिव्हिर वापरण्यासाठी मंजूर देण्यात आली आहे.

- Advertisement -

सुमित चंदा म्हणाले, “हा अभ्यास कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी संभाव्य उपचारात्मक पर्यायांबद्दल सांगतो, विशेष म्हणजे यापैकी बरेच रेणू आधीच क्लिनिकल डेटामध्ये सुरक्षित सापडले आहेत.” ते म्हणाले, “जागतिक महामारीवर लढा देण्यासाठी शास्त्रज्ञ समुदायासाठी हा अहवाल एक उत्तम शस्त्र असल्याचे सिद्ध होऊ शकते.” सध्या शास्त्रज्ञ लहान प्राण्यांवर या २१ कंपाऊंड चाचणी करत आहेत. जर हा अभ्यास प्रभावी सिद्ध झाला तर शास्त्रज्ञ COVID-19 च्या उपचारांसाठी क्लिनिकल चाचण्यांसाठी एफडीएची परवानगी घेतील, असे सांगितले जात आहे.


Corona : देशात पाच जागांवर होणार लसीच्या शेवटच्या मानवी चाचणीचे परिक्षण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -