RBI : रिझर्व्ह बँकेने ‘या’ सहकारी बँकेवर लादले निर्बंध; ग्राहकांकडून पैसे काढण्यावर मर्यादा

reserve bank of india restriction maharashtra co operative bank bans withdrawal money
RBI : रिझर्व्ह बँकेने 'या' सहकारी बँकेवर लादले निर्बंध; ग्राहकांकडून पैसे काढण्यावर मर्यादा

रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, या कारवाईमुळे ग्राहकांना आता बँकेतून पैसे काढण्यास बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोल्हापूरमधील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडवर आरबीआयने हे निर्बंध लागू केले आहेत. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही बँक आर्थिक संकटाचा सामना करत होती.

या बँकेतील 99.88 टक्के खातेधारक हे Deposit Insurance and Credit Guarantee Corporation विमा योजनेअंतर्गत येतात. या योजनेनुसार, खातेदारांना 5 लाख रुपयांच्या विम्याचे कव्हर मिळते. मात्र आता रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, बँकेवर 13 मे 2022 पासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुढील सहा महिने हे निर्बंध कायम असतील, त्यामुळे बँकेतील सर्व व्यवहार आणि कामकाजावर आरबीआयचे लक्ष असेल. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, बँकेत लिक्विडीटी ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बँकेतून पैसे काढण्यास ग्राहकांना मनाई करण्यात आली आहे. मात्र या कारवाईमुळे बँक पूर्णपणे बंद होणार नाही त्यामुळे ग्राहकांनी बँक बंद होणार असल्याचा गैरसमज करून घेऊ असे आरबीआयने म्हटले आहे.

या सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केलेला नाही, मात्र कोणत्याही प्रकारच्या कर्जाटे नुतनीकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. Deposit Insurance and Credit Guarantee Corporation नुसार बँक जमा असलेल्या रकमेवर ग्राहकांना विमा सुरक्षा मिळते. यातून कमीतकमी 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. यामुळे बँक बुडाली तर ग्राहकांना कमाल 5 लाख रुपये मिळू शकतात.


टकल्या म्हणणे हा देखील लैंगिक छळाप्रमाणे गंभीर गुन्हा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल