भाजपला सर्वधर्मांचा आदर, प्रवक्ता नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यावर पार्टीची स्पष्टोक्ती

नूपुर शर्माच्या विरोधात मुस्लिम समुदायामध्ये आक्रोश आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात खटला सुरु आहे.

bjp party's clear statement on the controversial statement of spokesperson Nupur Sharma

भाजपने पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते यानंतर भाजपवर विरोधकांनी टीकास्त्र डागलं होते. पार्टीने भाजप सर्व धर्माचा आदर करतो असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली असून नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला पाठिंबा नाही. एका टीव्ही चॅनलवर कार्यक्रमादरम्यान नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वक्तव्य केलं होते. भाजपने त्यांच्या या वक्तव्यापासून अंग झटकले असून पार्टी धार्मिक एकतेमध्ये विश्वास ठेवते असे सांगितले आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, भाजप कोणत्याही धर्माचा अपमान स्वीकारत नाही. तसेच कोणत्याही धर्मा आणि सांप्रदायिक भावनांना ठेच पोहोचवणाऱ्या विचारांचा स्वीकारत नाही.

भाजप मुख्यालय प्रभारींकडून रविवारी एक पत्र जारी करण्यात आले आहे. यामध्ये असे म्हटलं आहे की, भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्मांचा आदर करण्यात आला आहे. भाजप पक्ष सर्व धर्मांचा सम्मान करतो. तसेच कोणत्याही धर्माच्या व्यक्तीच्या अपमानाचा निषेध करते.

पक्षाने आपली बाजू स्पष्ट केली आहे.भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा अभ्यास करण्याचा अधिकार आहे. जसे की भारत आपले स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा आनंदोत्सव साजरा करत आहे, आम्ही भारताला एक महान देश बनवू शकतो. सर्व समानता आणि प्रत्येक समानतेची साथ असते, जिथे सर्व भारत आणि अखंडता एक जुळते, सर्व विकास आणि विकासाच्या फळाचा आनंद घेतात. नूपुर शर्माच्या विरोधात मुस्लिम समुदायामध्ये आक्रोश आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात खटला सुरु आहे.


हेही वाचा : बांगलादेशात भीषण स्फोट; आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू, ४५० पेक्षा जास्त जखमी