युरोपच्या मोंटेनेग्रोमध्ये अज्ञात व्यक्तीच्या गोळीबारात 11 नागरिकांचा मृत्यू; 6 जण जखमी

rest of world state prosecutor said on friday that eleven dead in mass shooting in montenegro

मॉन्टेनेग्रो:  दक्षिण युरोपच्या मॉन्टेनेग्रोमधील पश्चिम शहरातील रस्त्यावर एक अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दोन मुलांसह 10 लोकांची हत्या केली. यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने आरोपीला गोळी मारून ठार केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

मॉन्टेनेग्रोचे पोलिस प्रमुख झोरान ब्राझनिन यांनी मीडियासोबत शेअर केलेल्या व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये सांगितले की, हल्लेखोर हा 34 वर्षीय व्यक्ती होता, ज्याची ओळख त्याच्या नावाच्या सुरुवातीच्या दोन अक्षरांनी VB ने झाली आहे.

ब्राझनिनने सांगितले की, संशयिताने प्रथम आठ आणि 11 वर्षे वयोगटातील दोन मुलांवर आणि त्यांच्यावर आईवर रायफलने गोळ्या झाडल्या. हे कुटुंब सांतिजा येखील मेडोविना भागात हल्लेखोराच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. याचवेळी हल्लेखोर एका गल्लीतील रस्त्यावर गेला आणि आणखी 13 जणांवर गोळ्या झाडल्या. यापैकी
सात जणांचा मृत्यू झाला. मात्र VB ला हे घृणास्पद कृत्य करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले हे स्पष्ट नाही.

फिर्यादी अँड्रिजाना नॅस्टिक यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या तपासाचे समन्वय साधत पत्रकारांना सांगितले की, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने गोळी झाडून ठार केले, यात एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाला आहे. पंतप्रधान ड्रिटन अबाझोविक यांनी त्यांच्या टेलिग्राम या घटनेबाबत शोक व्यक्त केली आहे. त्यांनी लोकांना पीडितांच्या कुटुंबियांसोबत त्यांचे नातेवाईक, मित्र आणि सेटिंजेच्या सर्व लोकांसोबत राहण्याचे आवाहन केले.

अध्यक्ष मिलो जुकानोविक यांनी ट्विटरवर सांगितले की, सेटिंजे येथील भयंकर शोकांतिकेच्या वृत्तामुळे मला खूप दुःख झाले आहे. त्यांनी या घटनेत प्रियजन गमावलेल्या कुटुंबांसोबत एकत्र असल्याचे आवाहन केले.


जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात मोठी कारवाई; बिट्टा कराटेच्या पत्नी, सलाहुद्दीन मुलासह चार कर्मचारी बडतर्फ