घरदेश-विदेशतुर्की, सीरियात मृत्यूचं तांडव! भूकंपातील मृतांची संख्या 7800 पार

तुर्की, सीरियात मृत्यूचं तांडव! भूकंपातील मृतांची संख्या 7800 पार

Subscribe

तुर्कस्तान आणि सीरियात सोमवारी झालेल्या महाशक्तीशाली भूकंपातील मृतांची संख्या 7800 च्या पार गेली आहे. भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालून अद्याप अनेक मृतदेह काढले जात आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान एकट्या तुर्कस्तानमध्ये मृतांचा आकडा 6000 हजारांपर्यंत गेला आहे, तर 34, 810 जण जखमी झाले आहेत. तुर्कस्तानमध्ये इमारतींच्या ढिगाऱ्याखालून आत्तापर्यंत 8000 हून अधिक नागरिकांना बाहेर काढण्यातं आलं आहे, तर 3 लाख 80 हजारांच्या आसपास लोकांना सरकारी आश्रयस्थान आणि हॉटेलमध्ये आश्रय देण्यात आला आहे.

याचप्रमाणे सीरियातही भूकंपामुळे 1932 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्दोगन यांनी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या देशातील 10 दक्षिण प्रांतांमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. यासोबतच त्यांनी भूकंपग्रस्त भागात मदतकार्याला गती देण्यास सांगितले आहे. सीरियात जखमींचा आकडा हा 42,259 च्या पुढे जाऊन पोहचला आहे. तर मृतांचा आकडा सीरियातही वाढू शकतो.

- Advertisement -

अद्याप हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून मदतीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे सीरियातही मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे आठ हजार लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या विनाशकारी भूकंपामुळे परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. इमारती, रस्ते, वाहनांसह सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे.

- Advertisement -

तुर्कस्तान, सीरियासह ज्या भागात भूकंप झाला तिथे सर्वत्र केवळ कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा आणि आजूबाजूला मृतदेह दिसत आहेत. अनेक लोक त्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांचा शोध घेत आहेत. चारी बाजूंनी केवळ लोकांचा आक्रोश, यातना दिसत आहेत. ढिगाऱ्यातून सतत मृतदेह बाहेर काढले जात आहेत त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या रुग्णवाहिका, पोलिसांचे सायरन आणि पीडितांच्या किंकाळ्या ही सगळी परिस्थिती परिस्थितीची भीषणता सांगूण जात आहे. रुग्णालयेही जखमींनी पूर्ण भरलेली आहेत. मदत आणि बचाव पथक प्रत्येक क्षणी मदत करण्यात गुंतले आहेत.

बचाव कर्मचारी काळजीपूर्वक काँक्रीटचे दगड आणि लोखंडी रॉड काढत आहेत जेणेकरुन कोणीही त्या ढिगाऱ्याखाली वाचला असेल तर त्याला सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. ढिगाऱ्यातून कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज ऐकताच बचाव पथकांकडून शर्तीचे प्रयत्न करत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जाते.


अदानी-मोदींचे संबंध काय? लोकसभेत राहुल गांधींचा तिखट शब्दांत हल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -