घरदेश-विदेशजामा मशिदीतील मुलींच्या प्रवेशावरील निर्बंध हटवले, शाही इमामचा निर्णय

जामा मशिदीतील मुलींच्या प्रवेशावरील निर्बंध हटवले, शाही इमामचा निर्णय

Subscribe

पुरुषाला प्रार्थना करण्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार स्त्रीला सुद्धा आहे.

दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदीत मुलींच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. पण एका दिवसानंतर ही बंदी उठवण्यात आली आहे. याचसंदर्भांत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना हे जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांच्याशी बोलले आणि त्यांना जामा मशिदीत महिलांच्या प्रवेशावर बंदी घालणारा आदेश मागे घेण्याची विनंती केली. इमाम बुखारी यांनी आदेश रद्द करण्याचे मान्य केले आहे.

मशिदीच्या प्रतिष्ठेचा भंग करण्याची कोणालाही परवानगी दिली जाणार नाही, असे इमाम म्हणाले. जर एखादी मुलगी हातात फुले घेऊन मशिदीत शिरली तर तिची नक्कीच चौकशी केली जाईल.

- Advertisement -

यापूर्वी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. स्वाती मालिवाल यांनी ट्विट केले होते की, पुरुषाला प्रार्थना करण्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार स्त्रीला सुद्धा आहे. मी जामा मशिदीच्या इमामाला नोटीस बजावत आहे. महिलांच्या प्रवेशावर अशा प्रकारे बंदी घालण्याचा अधिकार कोणालाही नाही.

दरम्यान हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून जामा मशिदीचे पीआरओ सबीउल्ला खान यांनी स्पष्ट केले की, अविवाहित मुलींच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. हे धार्मिक स्थळ असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पण प्रार्थना करणाऱ्यांना कोणतेही बंधन नाही.

- Advertisement -

मशीद व्यवस्थापनाने केला तर्कहीन युक्तिवाद
दरम्यान, मशिदीत मुलींच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या निर्णयाबाबत मशीद व्यवस्थापनाने तर्कहीन युक्तीवाद केला आहे.महिलांच्या प्रवेशावर बंदी नसल्याचे जामा मशीद व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. केवळ अविवाहित महिलांना प्रवेश बंदी आहे. कारण या धार्मिक स्थळावर मुली अनुचित कृत्य करतात, व्हिडिओ शूट करतात. हे सर्व थांबवण्यासाठी बंदी घालण्याचे पाऊल उचलले आहे. कुटुंबं किंवा विवाहित जोडप्यांवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत, असे मशिदी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.


हे ही वाचा – ‘समान नागरी कायदा’ 2024 पर्यंत राज्यांनी लागू करावा अन्यथा…; अमित शाहांचा अल्टिमेटम

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -