घरअर्थजगतमहागाई नीचांकी पातळीवर, जुलै महिन्यातील आकडे दिलासा देणारे

महागाई नीचांकी पातळीवर, जुलै महिन्यातील आकडे दिलासा देणारे

Subscribe

महागाई दिवसेंदिवस वाढत असून अनेक वस्तूंच्या, भाजीपाल्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यातच जीएसटीतही वाढ करण्यात आल्याने सर्वच वस्तूंच्या किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जात आहेत. याचे पडसाद संसदेतही उमटले. दरम्यान, जुलै महिन्यात महागाई कमी असल्याचे आकडेवारी समोर आली आहे.

जुलै महिन्यात खाद्यपदार्थांच्या किंमतीत घट झाली होती. या काळात कच्चे तेल आणि कमोडिटी प्रोडक्टच्या किंमतीही कमी आल्या होत्या. त्यामुळे गेल्या चार महिन्यातील महागाईतील सर्वांत निचांक जुलै महिन्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

जुलैमध्ये किरकोळ महागाई 7 टक्क्यांच्या खाली पोहोचली होती. तसेच, जुलैमध्ये रिटेल महागाई दर ६.७१ टक्के होता, तर जूनमध्ये ७.०१ टक्के होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.०४ टक्के होता. एक महिन्यापूर्वी एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर ७.७९ टक्के होता. यानंतर जुलै महिन्यात अन्नधान्याच्या महागाईत घट झाली आहे.

  • एप्रिल २०२२ – ७.७९ टक्के
  • मे २०२२ – ७.०४ टक्के
  • जून २०२२ – ७.०१ टक्के
  • जुलै २०२२ – ६.७१ टक्के
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -