मागील महिन्यात महागाईच्या दरात किरकोळ घट, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा

मागील काही दिवसांपासून महागाईमध्ये (Inflation) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, गगनाला भिडलेल्या महागाईत सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात महागाईच्या दरात किरकोळ घट झाली आहे. भारताचा किरकोळ चलनवाढीचा दर मे महिन्यात ७.०४ टक्के इतका होता, जो एप्रिल महिन्याच्या तुलनेत किंचित कमी नोंदवण्यात आला आहे.

सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात खाद्यपदार्थ, पेट्रोल-डिझेल आणि विजेच्या दरात कपात झाल्याने महागाईचा दर कमी झाला आहे. कंज्यूमर प्राइस इंडेक्स आधारित किरकोळ चलनवाढीचा दर एप्रिलमध्ये ७.७९ टक्के वरून घटून ७.०४ टक्के झाला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात अद्यापही युद्ध सुरू..

रशिया आणि युक्रेन यांच्यात अद्यापही युद्ध सुरू असून १०० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला आहे. कच्चे तेल अजूनही प्रति बॅरल १२०डॉलरच्या वर आहे. सरकारी तेल कंपन्या तोट्यात असून पेट्रोल आणि डिझेलची विक्री करत आहेत. केंद्र सरकारने २१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क ८ आणि ६ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ६ राज्यांनीही व्हॅट कमी केला आहे.

व्याज दरवाढीला ब्रेक लागणार?

मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.०४ टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे, जो आरबीआयच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारने २१ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवर आठ रुपये आणि सहा रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सहा राज्यांनी व्हॅटमध्येही कपात केली.

आरबीआयच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महागाई ७.५ टक्के आणि पुढील तीन महिन्यांत ७.४ टक्के राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या तुलनेत शहरी भागातील खाद्य महागाई दरात वाढ झाली आहे.


हेही वाचा : उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक त्रस्त, देशातील या राज्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी