डोळे करणार तुमच्या मृत्यूची भविष्यवाणी

इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी असा अल्गोरिदम तयार केला आहे, जो तुमच्या डोळ्याचा रेटिना स्कॅन करून तुम्हाला सांगेल की, तुमचा मृत्यू किती दिवस, महिने किंवा वर्षांत होणार आहे.

Diabetes warning The signs in your eyes that could mean you have the disease
Diabetes Symptoms | डोळ्यांत दिसणारी 'ही' लक्षणे आहेत मधुमेहाचे संकेत: तुम्हीही दुर्लक्ष करत असाल तर....

डोळ्यातून आपण एखाद्यावरील प्रेम, राग, द्वेष, आनंद, भीती दाखवू शकतो. पण डोळ्यातून तुम्ही मृत्यूही पाहू शकता.
… हो तुम्ही बरोबर वाचले आहे. तुम्ही डोळ्यांतून मृत्यूही पाहू शकता. तेही तुमच्या मृत्यूपूर्वी अनेक महिने आणि वर्षे आधी हे पाहू शकतो. इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी असा अल्गोरिदम तयार केला आहे, जो तुमच्या डोळ्याचा रेटिना स्कॅन करून तुम्हाला सांगेल की, तुमचा मृत्यू किती दिवस, महिने किंवा वर्षांत होणार आहे.

युनायटेड किंगडममधील साडेतीन वर्षांत 47 हजार लोकांवर अल्गोरिदमची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. यातील एकतर मध्यमवयीन किंवा वृद्ध होते. या अल्गोरिदमद्वारे त्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1871 लोकांचा मृत्यू झाला. तेही अल्गोरिदमने सांगितलेल्या वेळेच्या आधीच. कारण त्यांच्या डोळ्यांचा रेटिना त्यांच्या खऱ्या वयापेक्षा खूप वयस्कर झाला होता. जेव्हा तुम्ही म्हातारे होऊ लागतात तेव्हा तुमच्या शरीरात अनेक बदल होतात. त्याचा प्रत्येक अवयवावर परिणाम होतो. पण याचा अर्थ असा नाही की, जर दोन व्यक्ती एकाच वयाची असतील तर दोघांवरही वयाचा प्रभाव सारखाच असेल. त्यांची शारीरिक स्थिती पूर्वीसारखी राहणार नाही.


एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात डोकावून त्याचे खरे बायोलॉजिकल वय ओळखता येते. यासोबतच भविष्यात व्यक्तीची तब्येत कशी असणार आहे हे देखील कळू शकते. त्यामुळेच इंग्लंडमधील एका शास्त्रज्ञाने मशीन लर्निंगच्या माध्यमातून असा अल्गोरिदम तयार केला आहे की, ज्याने फक्त रेटिना तपासल्यानंतर किती वेळाने तुमचा मृत्यू होण्याची शक्यता आहे हे कळू शकते.

जर अल्गोरिदमने एखाद्या व्यक्तीच्या रेटिनाची तपासणी केली आणि तो बायोलॉजिकलदृष्ट्या त्याच्या वास्तविक वयापेक्षा एक वर्षाने अधिक असेल. तर त्या व्यक्तीचा पुढील 11 वर्षांत कोणत्या ना कोणत्या आजाराने मृत्यू होण्याची शक्यता दोन टक्क्यांनी वाढते. यात हृदयाशी संबंधित किंवा कर्करोगासारखे आजार वगळता, मृत्यूची शक्यता तीन टक्क्यांपर्यंत जाते. हा प्रयोग अजूनही सुरू असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. पण ज्यांच्यासोबत हे केले गेले, त्यापैकी अनेकांचे अंदाज खरे ठरले.

या प्रयोगातून एक गोष्ट स्पष्ट होते की, वाढत्या वयाबरोबर डोळ्यांच्या रेटिनाला इजा होऊ लागते. हे तुमच्या वाढत्या वयासाठी खूप संवेदनशील आहे. कारण डोळयातील पडदा हा एकमेव अवयव आहे जिथे रक्तवाहिन्या आणि नसा एकत्र दिसतात आणि त्या  पाहण्यास सोप्प्या असतात. हे एखाद्या व्यक्तीच्या रक्तवहिन्यासंबंधी आणि मेंदूच्या आरोग्याविषयी अचूक माहिती देते.

याआधीही अनेक अभ्यास करण्यात आले आहेत, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, रेटिना पेशी तुमच्या शरीरातील हृदयरोग, किडनीचे आजार आणि वृद्धत्व, हृदयरोग, किडनीचे आजार याविषयी माहिती देऊ शकतात. परंतु असा हा पहिलाच अभ्यास आहे, ज्यामध्ये रेटिनल वयातील अंतर ओळखता आले. ते तुमच्या मृत्यूचे अचूक भाकीत करते. यासोबतच भविष्यात तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार होऊ शकतो हे देखील सांगते.


येस बँकेचे माजी एमडी राणा कपूर यांचा जामीन दिल्ली कोर्टाने फेटाळला