घरदेश-विदेशSushant Sucide Case : सुशांतची केस सीबीआयकडे सुपूर्द; केंद्राने केली बिहार सरकारची...

Sushant Sucide Case : सुशांतची केस सीबीआयकडे सुपूर्द; केंद्राने केली बिहार सरकारची शिफारस मंजूर

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची केस अखेर सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आली आहे. केंद्राने बिहार सरकारची सीबीआय चौकशीच्या शिफारसीची मागणी मंजूर केली आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वकिलांनी ही माहिती दिली. आता या केसची सीबीआय चौकशी होणार आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी केली जावी ही मागणी सोशल मीडियावर लावून धरण्यात आली होती. तसेच सुशांतच्या वडिलांनीही ही मागणी बिहार सरकारकडे केली होती.

केंद्र सरकारचे वकिल एस. जी. तुषार मेहता यांनी सुप्रिम कोर्टात माहिती दिली की, या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी. ही बिहार सरकारची मागणी केंद्राने मंजूर केली आहे. रिया चक्रवर्ती हिच्या वतीने वकिल श्याम दीवान यांनी बाजू मांडली असून त्यांनी सांगितले की, कोर्टाने रियाच्या याचिकेकडेही लक्ष द्यावे. तसेच सुशांतसंबंधीच्या सर्व याचिकांवरील सुनावणीवर स्थगिती देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर पासूनच त्याच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांसह पाटणा पोलीस देखील तपास करत आहेत. बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

‘रिया चक्रवर्ती कुठे लपली आहे ते मला माहित आहे’, सुशांतच्या वकिलांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -