घरट्रेंडिंगलॉकडाऊनमध्ये 'या' देशात एटीएमद्वारे पैसे नाही तर मिळतायत तांदूळ!

लॉकडाऊनमध्ये ‘या’ देशात एटीएमद्वारे पैसे नाही तर मिळतायत तांदूळ!

Subscribe

देशात निर्माण झालेल्या खाण्याच्या समस्येला विचारात घेता 'राईस एटीएम' (तांदूळ वितरण मशीन) तयार करण्यात आले

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी बऱ्याच देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यादरम्यान बऱ्याच लोकांचा रोजगारदेखील गेला तसेच रोजच्या जेवणाचीही समस्या निर्माण झाली. अशा परिस्थितीत गरजू लोकांना मदत करण्यासाठी एका देशाने अनोखी शक्कल लढवली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन तर होईल मात्र लोकांना दिवसभर तांदूळ मिळू शकणार आहे.

ही अनोखी शक्कल लढवणारा देश आहे व्हिएतनाम. या देशात निर्माण झालेल्या खाण्याच्या समस्येला विचारात घेता ‘राईस एटीएम’ (तांदूळ वितरण मशीन) तयार करण्यात आले आहे. या एटीएमच्या माध्यमातून कोणतीही गरजू व्यक्ती बँकेच्या एटीएमप्रमाणे तांदूळ विनामूल्य काढू शकेल. हे तांदळाचे एटीएम २४ तास काम करत आहे. व्हिएतनाम मधील एका व्यावसायिकाने पुढाकार घेत हे एटीएम तयार केले आहे.

- Advertisement -


बोल्ट म्हणतो, ‘असं पाळा सोशल डिस्टंसिंग’

गरजूंना उपयुक्त असे ‘राईस एटीएम’

व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोनाची २६२ प्रकरणं नोंदवली गेली आहेत. मात्र, अद्याप मृत्यूची नोंद झालेली नसली तरी ३१ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे छोटे व्यवसाय ठप्प झाले असून हजारो लोकांना कामावरून तात्पुरते काढून टाकण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्यांना हे ‘राईस एटीएम’ खूप उपयुक्त ठरत आहे. या एटीएममधून साधारण दीड किलो तांदूळ घेता येतात. रस्त्यावरील विक्रेते, घरकाम करणारे लोकं त्यांना हे एटीएम विशेष उपयुक्त ठरत आहेत. तसेच हे एटीएम हनोई, ह्यू आणि दानंग यासारख्या अन्य मोठ्या शहरांत देखील असे एटीएम तयार करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -