घरअर्थजगतRichest Indians in 2021 : 2021मध्ये सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत अंबानीना मागे टाकत...

Richest Indians in 2021 : 2021मध्ये सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत अंबानीना मागे टाकत अदानी सुस्साट; तर अजीम प्रेमजी मालामाल

Subscribe

ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानीची एकूण संपत्ती सध्या 75.3 अब्ज डॉलर आहे. ते मागील वर्षाच्या तुलनेत 41.5 अब्ज डॉलर अधिक आहे. म्हणजेच 2021 मध्ये अदानीची संपत्ती दुपटीहून अधिक झाली. एकेकाळी अदानी यांची एकूण संपत्ती 85 अब्ज डॉलरच्या पुढे गेली होती. मात्र, त्यानंतर अदानी समूहाच्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने त्यांची नेटवर्थ थोडी कमी झाली.

नवी दिल्लीः Richest Indians List 2021: गेल्या वर्षात अदानींच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झालीय, अझीम प्रेमजींनीही अंबानींपेक्षा जास्त कमाई केल्यानं भारतीय अब्जाधीशांसाठी 2021 हे वर्ष चांगले राहिलेय. यादरम्यान गौतम अदानी यांनी वेगाने विक्रमी कमाई केली आणि ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना मागे टाकण्याच्या मार्गावर पोहोचले. भारतीय अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी यांनी 2021 मध्ये सर्वाधिक $ 41.5 अब्ज कमावले.

अदानी अंबानींच्या अगदी जवळ पोहोचले होते

ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानीची एकूण संपत्ती सध्या 75.3 अब्ज डॉलर आहे. ते मागील वर्षाच्या तुलनेत 41.5 अब्ज डॉलर अधिक आहे. म्हणजेच 2021 मध्ये अदानीची संपत्ती दुपटीहून अधिक झाली. एकेकाळी अदानी यांची एकूण संपत्ती 85 अब्ज डॉलरच्या पुढे गेली होती. मात्र, त्यानंतर अदानी समूहाच्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने त्यांची नेटवर्थ थोडी कमी झाली.

- Advertisement -

प्रेमजी 2021 मध्ये कमाईतही अंबानींच्या पुढे

इंडेक्सनुसार, केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे सध्या 89.7 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे 13 अब्ज डॉलरहून अधिक आहे. 2021 मध्ये कमाईच्या बाबतीत विप्रोचे अझीम प्रेमजी यांनी अंबानींना मागे टाकले. 2021 च्या अखेरीस प्रेमजींची एकूण संपत्ती 41.2 बिलियन डॉलर होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 15.8 बिलियन डॉलरने वाढली.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -