Right to seat : बसण्याच्या अधिकाराने दुकान, मॉल्स कामगारांना मिळणार मोठा दिलासा

virus-fear-in-india-speeds-up-gold-buyers-shift-to-chain-stores

दुकाने, मॉल्स, शोरूममध्ये काम करणाऱ्या सेल्समनसाठी एक मोठा दिलासा कायदा येऊ पाहत आहेत. अनेकदा मोठ्या दुकानांमध्ये सेल्समनसाठी बसण्याची सीट नसते. त्यामुळेच तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच राईट टू सिट अंतर्गत सेल्समनला बसण्याचा अधिकार देणाऱ्या कायद्यावर संशोधन होत आहे. याआधीच केरळमध्ये तीन वर्षापूर्वीच या कायद्यावर संशोधन करून सेल्समनला हा अधिकार देऊ केला आहे. पण या कायद्यामुळे फक्त दुकानातच नव्हे तर अशा अनेक कामांमध्ये जिथे व्यक्तींना उभे रहावे लागते, अशा सर्व ठिकाणी या अधिकारान्वये कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. बराचवेळ उभ राहिल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. त्यामुळेच या कायद्याच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी चांगला निर्णय होणे अपेक्षित आहे.

राईट टू लाईफ 

तामिळनाडू सरकारने हा कायदा प्रस्तावित केला आहे. पण या प्रस्तावामागे एक महत्वाचे कारण आहे. कायद्यानुसार दुकानातील प्रत्येक कर्मचारी हा फक्त बसून काम करेल असे अपेक्षित नाही. कायद्यानुसार जेव्हा कर्मचाऱ्यांना कामातून विश्रांती मिळेल त्यावेळी बसण्यासाठीची सुविधा म्हणून हा पर्याय असणार आहे. संविधानामध्येही अनुच्छेद ४२ न्वये कामाच्या ठिकाणी योग्य सुविधा देण्यासाठी राज्य सरकारची जबाबदारी निश्चित केली आहे. तसेच अनुच्छेद २१ न्वये राईट टू लाईफ अंतर्गतही चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकारही स्पष्ट करण्यात आला आहे.

राईट टु सिट बाबत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती शिवकीर्ति सिंह यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने याबाबतचे धोरण निश्चित करायला हवे. सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच संबंधित सर्व घटकांचा विचार घेऊनच याबाबतच्या धोरणाच्या निश्चितीची गरज आहे. त्यासाठीच राज्य सरकारलाही पुढाकार घ्यावा लागणार आहे. कारण, सर्व कामाच्या ठिकाणी एकसमान कामाची पद्धत नसल्याने धोरण निश्चित करताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकारने संपुर्ण देशाचा विचार केला तर, निश्चितच एकच कायदा तयार करणे शक्य आहे. त्यामध्ये एकसमान धोरण गरजेचे असल्याचेही मत समोर आले आहे.

सैन्यात झेंडा घेऊन उभ्या राहणाऱ्या व्यक्तीपासून ते गार्डचे काम, सशस्त्र दल यासारख्या कामातही तासन तास उभे राहण्याची ड्युटी असते. पण याठिकाणी पर्यायी अशा काही तासांच्या अंतराने रिलिव्हर असतात. तसेच सैनिकांना विशेष गणवेश, बूट विशिष्ट प्रकारचे असतात, त्यामुळे पायांना आधार आणि सुरक्षा मिळते. पण अनेक कामे अशी आहेत ज्यामध्ये कामगारांना संपुर्ण दिवसभर उभ राहण्याशिवाय पर्याय नसतो. गारमेंट फॅक्टरीमध्ये संपुर्ण ८ ते ९ तासांच्या ड्युटीमध्ये थोडाही वेळ बसण्याची संधी मिळत नाही. अनेकदा चहाच्या दरम्यान १५ मिनिटांची विश्रांती मिळते, तर लंच ब्रेकमध्ये अर्धा तास विश्रांती मिळते. पण अशा सततच्या उभे राहण्याने पायाला सूज येण्याचा त्रास होतो. पायाच्या त्रासामध्ये वेरीकोस वेनचा त्रासही यामुळे होतो. तसेच शरीराच्या रक्तपुरवठ्यावरही याचा परिणाम होत असतो.