घरक्रीडाFarmers Protest : परदेशी रिहानाची कोरोना काळात ७ कोटींची मदत; सचिन तेंडूलकरने...

Farmers Protest : परदेशी रिहानाची कोरोना काळात ७ कोटींची मदत; सचिन तेंडूलकरने काय दिले?

Subscribe

आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने कोरोनाच्या काळात कोटींची मदत केली. पण, सचिन तेंडूलकरने काय केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या ७० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर अद्याप तोडगा काही निघालेला नाही. दरम्यान, या आंदोलनाचे परदेशातील अभिनेते आणि नागरिकही समर्थन करताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नुकतेच ट्विट केले होते. या ट्विटमुळे देशात चांगलीच खळबळ माजली. तर रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील अभिनेते, अभिनेत्री आणि खेळाडूंनीही ट्विट करत रिहानावर टीका केली आहे. भारतीय माजी खेळाडू सचिन तेंडूलकरने ट्विट करत “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाहेरच्यांनी फक्त पाहा, सहभागी होऊ नका”, अशी टीका रिहानावर केली होती. मात्र, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या रिहानावर अनेकांनी टीका केल्या पण, याच रिहानाने कोरोनाच्या काळात तब्बल ७ कोटींची मदत देखील केली होती. सचिन तेंडूलकरने काय मदत केली, असा आता प्रश्न उपस्थित होत आहे.

कोण आहे रिहाना?

रिहाना ही जगप्रसिद्ध पॉप गायिका आणि अभिनेत्री आहे. ती केवळ ३२ वर्षांचीच आहे. तिचा जन्म २० जानेवारी १९८८ रोजी बार्बाडोसमध्ये झाला आहे. तिने वयाच्या १५ व्या वर्षीच संगीत क्षेत्रात आपल्या करिअरला सुरुवात केली. रिहाना ही एक दानशूर व्यक्ती आहे. तिची सर्वात जास्त कमाई ही दान करण्यातच जाते.

- Advertisement -

क्लारा लॉयलेन फाऊंडेशनची स्थापना

रिहानाने २०१२ साली क्लारा लॉयलेन फाऊंडेशनची स्थापना केली. ही फाऊंडेश शिक्षण आणि इतर कार्यसाठी देखील काम करते. या फाऊंडेशनने मार्च २०२० मध्ये कोविडच्या महामारीसाठी ३६ कोटी रुपये दान केले होते. तसेच अमेरिकेमध्ये झालेल्या हिंचारात मृत्यू झालेल्या व्यक्तींकरता तिने एका कॅम्पेनप्रमाणे ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांच्यासोबत काम केले. दरम्यान, दोघांनी मिळून ४२ लाख उभे केले होते. त्यातील २१ लाख हे रिहानाने दिले होते. तसेच रिहानाने कोरोनाच्या काळात ७ कोटी रुपये दान केले होते.

एकीकडे परदेशी अभिनेत्री शेतकऱ्यांसाठी आवाज उठवत आहे, म्हणून तिच्यावर टीका केली जात आहे. पण, तिच अभिनेत्री महामारीच्या काळात मदतीचा हात देखील पुढे करते. मात्र, ज्या व्यक्ती रिहानावर टीका करत आहेत, त्याव्यक्तींनी कोरोनाच्या काळात किती मदत केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Farmers’ protest: ग्रेटा थनबर्गने भारताविरूद्ध मोहिम योजनेचे डॉक्युमेंट ट्विट करुन केले डिलीट


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -