घरदेश-विदेशलंडनमध्ये किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकाआधी गोंधळ, अज्ञात व्यक्तीला अटक

लंडनमध्ये किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकाआधी गोंधळ, अज्ञात व्यक्तीला अटक

Subscribe

लंडनमधील बंकिंगहम पॅलेसच्या बाहेर एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या अज्ञात व्यक्तीने राजवाड्याजवळ काहीतरी संशयास्पद (काडतुसे) फेकल्याबद्दल त्याला पकडण्यात आले आहे. मंगळवारी (ता. 02 मे) सायंकाळी सातच्या सुमारास अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतले.

लंडनमधील बंकिंगहम पॅलेसच्या बाहेर मंगळवारी (ता. 02 मे) घडलेल्या एका घटनेने चांगलाच गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी बकिंगहॅम पॅलेसच्या मैदानात शॉटगन काडतुसे असल्याच्या वस्तू फेकल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तिसरा किंग चार्ल्स याच्या राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या राज्याभिषेक सोहळ्यात जगभरातील नेते सहभागी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

लंडन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंकिंगहम पॅलेसच्या गेटजवळ आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने राजवाड्याच्या दिशेने अनेक वस्तू फेकल्या. ज्यानंतर शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. अधीक्षक जोसेफ मॅकडोनाल्ड यांनी प्रसार माध्यमांना पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, या परिसरात कोणताही गोळीबार झालेला नाही. तसेच, कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा सार्वजनिक सदस्यांना दुखापत झालेली नाही. पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून पुढील चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार? आणखी एका महिलेकडून लैंगिक छळाचा आरोप

ब्रिटीश मीडियाने वृत्त दिले की तिसरा किंग चार्ल्स (वय 74) आणि त्यांची पत्नी क्वीन कॉन्सॉर्ट कॅमिला (वय 75) हे दोघेही घटना घडली तेव्हा राजवाड्यात नव्हते. बंकिंगहम पॅलेसच्या अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच बंकिंगहम पॅलेसकडे जाणारा मॉल शनिवारी राज्याभिषेकाच्या तयारीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या राज्याभिषेक सोहळ्यात एक हजारो सैनिकांचे औपचारिक सैन्य बंकिंगहम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर अॅबेपर्यंतच्या मिरवणुकीत भाग घेतील. त्यामुळे या मिरवणुकीला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईच्या डब्बेवाल्यांकडून राज्याभिषेकाची तयारी
या राज्याभिषेकासाठी मुंबईतील प्रसिद्ध अशा समुहाला म्हणजेच डब्बेवाल्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. ब्रिटीश परराष्ट्र मंत्रालयाकडून हे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. या आमंत्रमणानंतर मुंबईच्या डब्बेवाल्यांनी विशेष तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकासाठी डब्बेवाल्यांनी किंगसाठी भेटवस्तू म्हणून पुणेरी पगडी आणि वारकरी संप्रदायाची शॉल खरेदी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -