घरदेश-विदेश"माझ्या मुलीमुळे ऋषी सुनक प्रधानमंत्रीपदी", सुधा मूर्तींनी दिली माहिती

“माझ्या मुलीमुळे ऋषी सुनक प्रधानमंत्रीपदी”, सुधा मूर्तींनी दिली माहिती

Subscribe

ऋषी सुनक हे पंतप्रधान कसे बनले याबाबत सुधा मूर्ती यांनी खुलासा केला आहे. माझ्या मुलीमुळे आज ऋषी सुनक हे पंतप्रधान बनल्याचा दावा सुधा मूर्ती यांच्याकडून करण्यात आला आहे.

ब्रिटेनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक (Britain PM Rishi sunak) यांच्या सासूबाई आणि भारतीय लेखिका आणि इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murthy) या नेहमीच वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत असतात. पण आता त्यांनी ऋषी सुनक हे पंतप्रधान कसे बनले याबाबत खुलासा केला आहे. सुधा मूर्ती म्हणाल्या की, माझ्या कुटुंबात अनेक दिवसांपासून दर गुरुवारी उपवास ठेवण्याची परंपरा आहे. सुनक सुरुवातीपासून इंग्लंडमध्ये राहत असले तरी ते खूप धार्मिक आहे. मूर्ती घराण्याची परंपरा तेही जपत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या पंतप्रधान होण्यामागे कोणाचा हात आहे हे सुधा मूर्ती यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी दावा केला आहे की त्यांच्या मुलीमुळे ऋषी सुनक हे ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पांजरापोळ : झाडांचे सर्वेक्षण सुरू, पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुधा मुर्ती म्हणताना दिसत आहेत की, मी माझ्या पतीला बिझनेसमन बनवले. तर माझी मुलगी अक्षताने तिच्या पतीला ब्रिटनचे पंतप्रधान केले. याचे कारण म्हणजे पत्नीचा महिमा. बायको नवऱ्याला कसे बदलू शकते बघा. पण मी माझा नवऱ्याला बदलू शकले नाही. मी माझ्या पतीला उद्योगपती बनवले आणि माझ्या मुलीने तिच्या पतीला पंतप्रधानपदी बसवले. अक्षता आणि ऋषी हे एकमेकांची काळजी घेतात. पण अक्षता ही कायमचं सुनक यांच्या खाण्याला घेऊन चिंतेत असते.

- Advertisement -

 ऋषी सुनक यांनी सुरुवातीचे शिक्षण इंग्लंडमधील ‘विंचेस्टर कॉलेज’मधून घेतले. त्यांनी पुढील शिक्षण ऑक्सफर्डमधून केले. 2006 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवीही मिळवली. स्टॅनफोर्ड विद्यापीठात एमबीए करत असताना ऋषी सुनक यांची अक्षता मूर्तीशी भेट झाली. अक्षता इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा नारायण मूर्ती यांच्या कन्या. या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 2009 मध्ये दोघांनी बंगळुरूमध्ये भारतीय परंपरेनुसार लग्न केले. अक्षता इंग्लंडमध्ये स्वतःचा फॅशन ब्रँडही चालवते. आज ती इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. सुनक दाम्पत्याला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -