घरदेश-विदेशब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर; मैदानात उरले फक्त चार प्रतिस्पर्धी

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर; मैदानात उरले फक्त चार प्रतिस्पर्धी

Subscribe

ब्रिटनमधील मतदार ऋषी सुनक हे चांगले पंतप्रधान मानतात. रविवारी एका नव्या ओपिनियन पोलमध्ये हा दावा करण्यात आला आहे

माजी कुलपती ऋषी सुनक यांनी सोमवारी संसदेतील कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांमध्ये सर्वाधिक मते मिळवली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी टॉम तुर्गेदत सर्वात कमी मत मिळवून पंतप्रधान होण्याच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. मतदानाच्या तिसऱ्या फेरीत ब्रिटीश भारतीय माजी अर्थमंत्री यांना 115 मत मिळाली आहेत. व्यापार मंत्री पेनी मॉर्डेंट 82 मतांसह परराष्ट्र सचिव लिझ ट्रस 71 आणि कॅमी बॅडेनोक 58 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

हेही वाचा – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक दुसऱ्या फेरीतही आघाडीवर

मंगळवारी होणाऱ्या मतदानाच्या पुढील फेरीत ही यादी आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. गुरुवारपर्यंत केवळ दोनच उमेदवार रिंगणात राहणार आहेत. 5 सप्टेंबरपर्यंत विजयी उमेदवार तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सनच्या जागी नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेईल.

- Advertisement -

ब्रिटनमधील मतदार ऋषी सुनक हे चांगले पंतप्रधान मानतात. रविवारी एका नव्या ओपिनियन पोलमध्ये हा दावा करण्यात आला आहे. ‘द संडे टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार, जेएल पार्टनर्सने केलेल्या ओपन पोलमध्ये 4,400 हून अधिक लोकांचा समावेश होता. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांपैकी 48 टक्के लोकांचा असा विश्वास होता की, भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक असलेले सुनक चांगले पंतप्रधान बनतील.

हेही वाचा – ब्रिटनमध्ये ५ सप्टेंबरला ठरणार नवे पंतप्रधान, ऋषी सुनकही शर्यतीत

हे पहिले सर्वेक्षण आहे, ज्यात परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत दुसरे स्थान मिळाले आहे. सर्वेक्षण सामील व्यक्तींपैकी 39 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी ट्रस यांना आणि 33 टक्के लोकांनी व्यापार मंत्री पेनी मॉर्डॉन्ट यांना पाठिंबा दिला आहे.


आईसाठी मदत करा म्हणत चार महिला आमदारांची ऑनलाइन फसवणूक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -