ऋषि सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची चिन्हे! मतदानाच्या दुसऱ्या फेरीतही आघाडीवर

बुधवारी पहिल्या फेरीतही ऋषि सुनक यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यांना 88 मते मिळाली

rishi sunak pm race in uk britain new prime minister boris johnson

बोरिस जॉन्सन यांच्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतील भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांमधील मतदानाच्या दुसऱ्या फेरीत बाजी मारली आहे. यांना मतदानाच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक म्हणजे 101 खासदारांनी मतदान केले आहे. दुसऱ्या फेरीत भारतीय वंशाच्या अटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन यांचा 27 मतांनी पराभव केला. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून त्या आऊट झाल्या आहेत.

दुसऱ्या फेरीत ब्रिटनच्या अर्थमंत्री पेनी मॉर्डेंट यांना 84 मते मिळाली, तर परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना 64 मते, माजी कॅबिनेट मंत्री केमी बॅडनोक यांना 49 मते आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते टॉम तुगेंदत यांना 49 मते मिळाली. सध्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत 6 उमेदवार बाकी आहेत. मतदानाच्या प्रत्येक फेरीत सर्वात कमी मतांचा एक उमेदवार शर्यतीतून बाहेर जाईल आणि अखेरीस दोन उमेदवार शिल्लक राहतील. त्यातूनच देशाचा नवा पंतप्रधान निवडला जाईल. त्यानंतरच कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याची घोषणा केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षाचे नेते ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. तोपर्यंत बोरिस जॉन्सन हे काळजीवाहू पंतप्रधान राहतील. नवीन पंतप्रधान 5 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारतील आणि 7 सप्टेंबर रोजी संसदेत विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जातील.

बुधवारी पहिल्या फेरीतही ऋषि सुनक यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यांना 88 मते मिळाली. मतदानाच्या पहिल्या फेरीत माजी परराष्ट्र सचिव जेरेमी हंट यांना कमीत कमी 30 मते मिळाली आणि तेही शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

कोण आहेत ऋषि सुनक

ऋषि सुनक हे नारायण मूर्ती यांचे जावई आहेत, जे इन्फोसिसचे अध्यक्ष होते. यॉर्कशायर रिचमंड येथून ते खासदार आहेत. 2015 मध्ये संसदेत पाऊल ठेवणारे ऋषि हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यांपैकी एक होते ज्यांनी बोरिस जॉन्सन यांच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. ब्रेक्झिटमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनमधील छोटे व्यवसाय अधिक चांगली कामगिरी करतील, असा त्यांचा विश्वास होता. अर्थमंत्री होण्यापूर्वी सुनक हे राजकोषागाराचे मुख्य सचिव आणि अर्थमंत्र्यांचे सेकंड-इन-कमांडही होते.


शीख नेते रिपुदमन यांची निर्घृण हत्या; कनिष्क बॉम्बप्रकरणात समोर आलं होत नाव