प्रदूषणाने दिल्लीचं झालं गॅस चेंबर; दिवाळीत फटाके न फोडण्याचं आवाहन

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दिल्लीत प्रदूषणाने कहर केला आहे. त्यामुळे दिल्लीला आता कोरोना आणि वाढत प्रदूषण या दोघांचा सामना करावा लागणार आहे.

world health organization report delhi is most polluted capital city in the world
जगातील सर्वाधिक वायुप्रदूषण एकट्या दिल्लीत, प्रदूषित ५० शहरांमध्ये भारताचा ३५ वा क्रमांक - रिपोर्ट

कोरोनाच्या विळख्यातून दिल्ली अजून बाहेर आलेली नाही.त्यात दिल्लीसमोर आणखी एक संकट ओढवले आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दिल्लीत प्रदूषणाने कहर केला आहे. दिल्लीत होणाऱ्या प्राणघातक धुराने राजधानी दिल्ली हळूहळू ताब्यात घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे दिल्लीला आता कोरोना आणि वाढत प्रदूषण या दोघांचा सामना करावा लागणार आहे. दिल्लीतील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले आहे. गुरूवारी दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी AQI पातळीवर ४०० ते ७०० प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे.

दिल्लीच्या वातावरणात मिसळलेल्या घातक वायूंमुळे दिल्लीचं आता गॅस चेंबरमध्ये रूपांतर झाल्यासारखं वाटत आहे. दिल्लीत असलेल्या गगनचुंबी इमारती धूरामुळे दिसेनाश्या झाल्या आहेत. प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम होत आहे अशी दिल्लीतील लोकं तक्रार करीत आहेत. डाळ्यांमध्ये जळजळ तसेच श्वास घेण्यासही कठीण झाले आहे. दिल्लीमध्ये सकाळ पासून हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर नोंदवली आहे. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट येणार नाही यावर डॉक्टर संशोधन करत आहेत. कारण दिल्लीच्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे अनेक आजार होत आहेत.

दिल्लीच्या आरके पुरम परिसरात प्रदूषणाची पातळी ४५१ क्वालिटी इंडेक्स नोंदवण्यात आली. जी अत्यंत धोकादायक आहे. लोधी रोडवरिल AQI ३९४ नोंदवला गेला आहे. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४४० तर द्वारकामध्ये ४५६ AQI नोंदवला गेला.

दिवाळी नंतर दिल्लीच्या प्रदूषणात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिवाळीत फटाके न फोडण्याचं आवाहन केलं आहे. दिल्लीत एका बाजूला कोरोना आणि दुसऱ्या बाजूला प्रदूषणाने कहर केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मागच्या २४ तासात दिल्लीत जवळपास ७ हजार नवीन कोरोना पॉझिटिव्ह समोर आले आहेत. दिल्ली सरकार याला कोरोनाची तिसरी लाट असं म्हणत आहेत. दिल्लीत काल ६८४२ नवीन रूग्ण समोर आले आहेत. तर ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आत्तापर्यत कोरोना रूग्णांची संख्या ४ लाखांवर पोहचली आहे.


हेही वाचा – US Elecction: मराठमोळे ‘ठाणेदार’ झाले अमेरिकेतले आमदार