घरCORONA UPDATEआता ताप नव्हे कोरोनाची 'ही' नवीन लक्षणे, वृद्धांपेक्षा तरूणाईत संक्रमण वाढतेय

आता ताप नव्हे कोरोनाची ‘ही’ नवीन लक्षणे, वृद्धांपेक्षा तरूणाईत संक्रमण वाढतेय

Subscribe

वृद्धांपेक्षा तरुणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

राज्यासह देशाभरात कोरोनाचे संसर्ग झपाट्याने वाढत आहे. लहान बाळापासून, तरुण तसेच वृद्धांपर्यत कोरोचा धोका वाढत आहे. देशात दिवसाला १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशातील ६० वर्षांवरील वृद्धांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली होती. मात्र दुसऱ्या लाटेत हे चित्र बदलताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेत वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होताना आढळून आले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या लक्षणांध्येही बदल होताना दिसत आहे. वृद्धांपेक्षा तरुणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे, असे जेनेस्टिंग्ज डायग्नोस्टिकच्या प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे देशातील तरुणांनी आता सर्वात जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

तरुणांमध्ये आढळणारी नवीन लक्षणे 

देशातील तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्यांच्यात आढळणाऱ्या लक्षणांमध्येही काही बदल झालेले दिसून आले आहेत. बऱ्याच तरुणांमध्ये तोंड कोरडे होणे, पोटाच्या समस्या जाणवणे, मळमळ होणे, बराच काळ अशक्तपणा जाणवणे ही लक्षणे दिसून येत आहेत. तर डोळे लाल होणे आणि डोके दुखणे ही प्रमुख लक्षणे दिसून येत आहेत. आधी कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप येत होता. मात्र आता तापाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. मात्र इतर लक्षणे आढळून आल्यामुळे अनेक तरुणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाची लक्षणांमध्येही बदल झाला आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यात देशातील तरुणांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.


हेही वाचा – जगात कोरोनामुळे मृतांची संख्या ३० लाख पार; भारत दररोज रचतोय नकोसे विक्रम

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -