अमेरिकेसह युरोपीय देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला, जाणून घ्या रोगाचा प्रवास

monkey pox

जगभरात दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग कायम आहे. जगभरातील देश या रोगाविरुद्ध लढा देत आहे. यातच मंकीपॉक्स विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग वाढत आहे. भारतात दोन मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. 70 पेक्षा जास्त देशात मंकीपॉक्सचा उद्रेक झाला आहे .

मंकीपॉक्स विषयी पाच महत्त्वाच्या गोष्टी –

  1. पहिल्यांदा आफ्रिकेतील देशात मंकीपॉक्सचा विषाणू आढळा होता. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये नऊ वर्षांच्या मुलामध्ये मंकीपॉक्स विषाणूचा संसर्गाची पहिली नोंद झाली होती. त्यानंतर आफ्रिकेतील सुमारे 11 देशात मंकीपॉक्स विषाणू आढळला होता.
  2. मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग 2003 मध्ये आफ्रिकेबाहेरील देशात दुसऱ्या आढळला होता. आफ्रिकेबाहेर अमेरिकेत पहिल्यांदा मंकीपॉक्स विषाणू आढळला. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने आतापर्यंत एकून 87 रुग्णांची नोंद केली आहे. मात्र, अमेरिकेत आतापर्यंत मंकीपॉक्सच्या एकाही संक्रमित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
  3. मंकीपॉक्स विषाणूचा संरर्ग आतापर्यंत एकून 73 देशात हजारांहून अधिक लोकांना झाला आहे. यामध्ये भारताची समावेश आहे. सध्या ब्रिटन, कॅनडा, स्पेन, पोर्तुगाल आणि अमेरिका या देशांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग वाढला आहे.
  4. मंकीपॉक्स संसर्गामुळे स्नायू दुखणे, पाठदुखी, थकवा, डोकेदुखी आणि ताप यासारखी लक्षणे दिसतात. यानंतर, संपूर्ण शरीरात गोवर सारखे पुरळ दिसू लागतात. हा रोग संक्रमित प्राणी किंवा मानवाच्या संपर्कातून पसरतो, हा रोग प्रथम माकडांमध्ये आढळला होता. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं (CDC) या विषाणूला ‘मंकीपॉक्स’ असे नाव दिले.
  5. जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक ओरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस यांनी आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली आहे.