घरी परतणाऱ्या कामगारांच्या रेल्वे प्रवासाच्या खर्चावर रितेश देशमुखने दिली ‘ही’ प्रतिक्रीया!

घरी परतणाऱ्या कामगारांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च कॉंग्रेस करणार असल्याची मोठी घोषणा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी केली आहे.

देशात कोरोना व्हायरसा वाढता प्रार्दुभाव बघता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. त्याचबरोबर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर असं म्हटलं जात आहे की, मजुरांना स्वत:च्या तिकीटाचे पैसे स्वत: द्यावे लागणार आहेत. या मुद्द्याला धरून अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट केलं आहे. सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आपल्या ट्वीटमध्ये रितेश देशमुख म्हणतो की, आपण आपल्या देशातील प्रवासी मजुरांचा प्रवासाचा खर्च करायला हवा. जे आपल्या घरी परत जात आहेत. हे ट्वीट करताना रितेशने एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो बघितल्यावर आपसुकच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. या फोटोत आपल्या आईला कडेवर घेऊन एक मुलगा चालत आहे. हा फोटो शेअर करत रितेशने लिहिले आहे की, या प्रवासी मजुरांचा खर्च करण्याची गरज आहे. रेल्वे सेवा फ्री असण्याची अवश्यकता आहे. कारण या कोरोना व्हायरसमुळे अन्न, पैशाच्या दबावात हे मजुर आहेत. रितेशच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

घरी परतणाऱ्या कामगारांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च कॉंग्रेस करणार असल्याची मोठी घोषणा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी केली आहे. कॉंग्रेसने ट्वीट करून लिहिलं आहे की, “भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने निर्णय घेतला आहे की घरी परतणाऱ्या प्रत्येक गरीब कामगारांचा तिकीटाचा खर्च कॉंग्रेस करेल.”, “कामगार हे देशाचा कणा आहेत. त्यांची मेहनत आणि त्याग हा राष्ट्र उभारणीचा पाया आहे. केवळ चार तासांच्या सूचनेवर लॉकडाऊन झाल्यामुळे लाखो कामगार घरी जाण्यापासून वंचित राहिले. १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदाच देशात हजारो कामगारांना शेकडो किलोमीटर चालून घरी परत जावं लागलं. रेशन नाही, पैसे नाहीत, औषधे नाहीत, साधन नाही पण फक्त गावी परत जाण्याची वचनबद्धता. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या वेदनेचा विचार करून थरथर कापू लागली. पण देशाचं आणि सरकारचं कर्तव्य काय? आजही लाखो कामगारांना संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून घरी परत जायचं आहे. परंतु कोणतेही साधन, पैसा नाही. दुःखाची बाब म्हणजे या कष्टकरी लोकांना अडचणीच्या वेळी भारत सरकार आणि रेल्वे मंत्रालय रेल्वे प्रवास भाडं आकारत आहे.”


हे ही वाचा- घरी परतणाऱ्या कामगारांचा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार – सोनिया गांधी