घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरात विधानसभा निवडणूक 2022 : भाजपाच्या रिवाबा जडेजा यांनी भरला उमेदवारी अर्ज

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 : भाजपाच्या रिवाबा जडेजा यांनी भरला उमेदवारी अर्ज

Subscribe

येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपासह सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या तयारीला सुरूवात केली आहे.

येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपासह सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या तयारीला सुरूवात केली आहे. अशातच आज भारतीय संघाचा फिरकीपटू रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजप नेते रिवाबा जडेजा यांनी जामनगर (उत्तर) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे रवींद्र जडेजाने आपल्या पत्नीच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. (rivaba jadeja to file nomination on monday ravindra jadeja seen with wife in bjp program)

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने रविवारी जामनगरच्या जनतेला पत्नी रिवाबा जडेजाला मतदान करण्याचे आवाहन केले. जडेजाने हा व्हिडिओ ट्विटरवर टाकला आहे. या व्हिडीओमध्ये “गुजरातमध्ये निवडणुका असून हे एखाद्या T20 सामन्यासारखे आहे. माझी पत्नी भाजपच्या तिकिटावर राजकारणात पदार्पण करत आहे. ती उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यावेळी मी जामनगरच्या जनतेला आणि सर्व क्रिकेटप्रेमींना मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन करतो”, असे रवींद्र जडेजा याने म्हटले.

- Advertisement -

रिवाबा यांनी जामनगर (उत्तर) जागेसाठी विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह जडेजा यांच्या जागी भाजपचा चेहरा म्हणून निवड करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत आमदार धर्मेंद्र सिंह यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलेले नाही.

भाजपाकडून 167 उमेदवारांची नावे जाहीर

- Advertisement -

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने रविवारी आणखी एका उमेदवार घोषणा केली. वाधवन विधानसभा मतदारसंघातून पक्षाने जगदीशभाई मकवाना यांना उमेदवारी दिली आहे. गुजरात निवडणुकीसाठी पक्षाने आतापर्यंत 167 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

160 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 14 महिला

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी 182 जागांपैकी 160 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 160 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 14 महिला, 13 एससी, 24 एसटी आणि 69 उमेदवारांची पुनरावृत्ती झाली आहे.


हेही वाचा – उद्या सकाळपर्यंत अटक करू नका, ठाणे न्यायालयाचा आव्हाडांना दिलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -