दिल्लीत एका प्रसिद्ध सोशल मीडिया ‘इन्फ्लुएन्सर’नं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिमरन सिंह, असं या ‘इन्फ्लुएन्सर’चं नाव आहे. सिमरन सिंह रेडिओ जॉकीचं कामही करत होती. मात्र, तिच्या आत्महत्येचं वृत्त आल्यानंतर सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांना एकच धक्का बसला आहे.
मुळची जम्मूची असलेली सिमरन दिल्लीतील गुरूग्राम येथील सेक्टर-47 मधील एका सोसायटीत राहत होती. गुरूवारी सकाळी सिमनरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरन काही दिवसांपासून तणावात होती. मात्र, तणावाचे कारण समोर आलं नाही. शवविच्छेदन केल्यानंतर गुरूवारी सिमरनचा मृतदेह तिच्या कुटुंबाला देण्यात आला. याप्रकरणी पोलिसांकडे कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. तसेच, पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली नाही.
चार महिन्यांनी सिमरन आपल्या मित्रासोबत लग्न करणार होती. तसेच, सिमरनने मित्रासोबत एक जाहिरात कंपनी सुरू केली होती. सिमरनने रेडिओ जॉकीचं काम दोन वर्षापूर्वी सोडलं होते. सेक्टर-47 येथील सोसायटीत सिरमन आणि तिच्या सहकाऱ्यांनी तीन फ्लॅट घेतले होते. तिसऱ्या फ्लॅटमध्ये सिमरनच्या जाहिरात कंपनीतील सदस्य राहत होते.
हेही वाचा : मी कमकुवत होतो की नाही…, संयमी मनमोहन सिंगांनी पत्रकाराला एका वाक्यात केलेले शांत