RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना आज पहाटे 4 च्या सूमारास पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी तोल गेल्याने ते पाटण्यातील राहत्या घरी कोसळल्याने त्यांची प्रकृती खालावली होती..

Lalu Prasad Yadav

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना आज पहाटे 4 च्या सूमारास पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी तोल गेल्याने ते पाटण्यातील राहत्या घरी कोसळले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती.

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दाखल केले रुग्णालयात –

पाटण्यातील राहत्या घरी पडल्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या खांद्याच्या हाडात किरकोळ फ्रॅक्चर झाले होते. कौटुंबातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. लालू यादव यांना त्यांचा धाकटा मुलगा आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी स्वतः रुग्णालयात आणले होते.

अनेक आजार  –

आरजेडी प्रमुख रविवारी संध्याकाळी त्यांच्या घरातील पायऱ्यांवरून खाली पडले होते. त्यामुळे त्यांच्या खांद्याचे हाड तुटले. त्याला आधीच अनेक आजार आहेत. यादव यांना किडनीचाही गंभीर त्रास आहे. ते सध्या पत्नी राबडी देवी यांना दिलेल्या शासकीय निवासस्थानी राहतात. माजी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणामुळे त्यांची दोन्ही मुले तेजस्वी आणि तेज प्रताप यादव हे देखील येथे राहतात.

कार्यकर्त्यांकडून प्रकृतीची विचारपूस –

लालू प्रसाद यादवयांची प्रकृती खालावल्याने राजद कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राबडी देवी यांचे निवासस्थान आणि पारस रुग्णालयात पोहोचून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पडल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, प्राथमिक उपचार आणि विश्रांतीचा सल्ला देऊन त्यांना घरी पाठवण्यात आले. लालू यादव यांना दुखापत झाल्याची माहिती मिळताच त्यांचे समर्थक काल रात्री त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी पोहोचले होते. चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव बराच काळ तुरुंगात होते. आता ते जामिनावर बाहेर आले आहेत. तुरुंगात असतानाही त्यांना प्रदीर्घ आजारामुळे रांची येथील रिम्समध्ये दाखल करण्यात आले होते.