घरताज्या घडामोडीअमित शहांचा हनुमान NDAतून बाहेर, दुसऱ्या घटक पक्षाने काढला सरकारचा पाठिंबा

अमित शहांचा हनुमान NDAतून बाहेर, दुसऱ्या घटक पक्षाने काढला सरकारचा पाठिंबा

Subscribe

नव्या कृषी कायद्यांविरोधात अमित शहा यांच्या भरवशाच्या हनुमान बेनीवाल यांनी एनडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीएतल्या दुसऱ्या घटक पक्षाने बाहेर पडत नव्या कृषी कायद्याविरोधातला बिगुल वाजवला आहे. नव्या कृषी कायद्याला विरोध करत अकाली दल पाठोपाठ बाहेर पडणारा हा दुसरा घटक पक्ष आहे. लवकरच दिल्ली गाठणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी (RLP) चे खासदार असलेल्या हनुमान बेनीवाल यांनी सरकारमधून बाहेर पडत एनडीएतून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

आरएलपी नेते आणि खासदार हनुमान बेनीवाल यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी शेतकऱ्यांचे समर्थन करत एनडीएतून बाहेर पडत आहोत. आरएलपी हा राजस्थानमधील प्रादेशिक पक्ष आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाने भाजपसोबत एकत्र येत निवडणुक लढली होती. हनुमान बेनीवाल नागौर या भागातून खासदार आहेत. याआधीच त्यांनी शेतकऱ्यांना समर्थन देत सर्व समित्यांमधून राजीनामा दिला होता. बेनीवाल राजस्थान भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांच्या विरोधी गटातील नेता मानल जात होते. २०१९ मध्ये वसुंधरा राजे यांना बाजूला सारत बेनीवाल यांचा समावेश एनडीएत करण्यात आला.

हनुमान बेनीवाल यांनी दिला अल्टीमेटम

कृषी कायद्याविरोधात हनुमान बेनीवाल यांनी अल्टीमेटम दिला होता. त्यांनी कृषी कायदे मागे घ्या असेही सांगितले होते. बेनिवाल यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे की देशाचा अन्नदाता एन थंडीत रस्त्यावर उतरला आहे. सरकारला हे शोभा देणारे नाही. केंद्र सरकारने तत्काळ कृषी विधेयके मागे घ्यावीत आणि शेतकऱ्यांचा सन्मान करावा. जर कृषी विधेयके मागे घेतली नाहीत तर पाठिंबा काढून घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -