धक्कादायक! एका रिक्षात 14 जण; बसच्या धडकेत 7 महिलांचा जागीच मृत्यू

रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तल्लारेवू बायपास रोडवरील राजमार्गावर विरुद्ध दिशाने जात असलेल्या एका भरधाव खासगी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही बस यानमकडे जात होती. या रिक्षा आणि बसच्या धडकेत रिक्षामधील सात महिलांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघे सात लोक बसण्याची क्षमता असलेल्या या रिक्षातून 14 जण प्रवास करत होते.

एका रिक्षात तब्बल 14 जण प्रवास करत असताना त्या रिक्षाने बसला दिलेल्या धडकेत 7 महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात रविवारी दुपारी 3:30 वाजताच्य सुमारास घडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर, उर्वरित सात जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. (Road accident in andhra pradesh fierce collision between auto and bus 7 Womens dead)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तल्लारेवू बायपास रोडवरील राजमार्गावर विरुद्ध दिशाने जात असलेल्या एका भरधाव खासगी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही बस यानमकडे जात होती. या रिक्षा आणि बसच्या धडकेत रिक्षामधील सात महिलांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघे सात लोक बसण्याची क्षमता असलेल्या या रिक्षातून 14 जण प्रवास करत होते.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा अधिक तपास करत असताना बस चालकाला ताब्यात घेण्यात आले. या अपघातातून ऑटो रिक्षा चालक बचावला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिक्षातून प्रवास करणाऱ्या 14 जणांपैकी 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, एका महिलेचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या रिक्षात सात प्रवासी बसण्याची क्षमता होती. मात्र, या रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेण्यात येत होते. हे सर्व प्रवासी मजूर आहेत. हे सर्वजण झिंगा फॉर्ममध्ये काम करत होते. या अपघातात सातजण गंभीर जखमी झाले आहेत.

ग्रामस्थांच्या मदतीने या जखमींना काकीनाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. तसेच या अपघातातील वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. दरम्यान या मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अपघातानंतर पोलिसांनी मृतकांच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती दिली आहे. त्यानंतर या मृतांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. बस आणि रिक्षा दोघांचंही कंट्रोल सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर सर्वात आधी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी येऊन तातडीने मदत कार्याला सुरुवात केली.


हेही वाचा – शिंदे-फडणवीसांच्या दबावानंतर माझ्यावर गुन्हा दाखल – संजय राऊत