यमुना एक्स्प्रेसवर बोलेरो आणि डंपरचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवर बोलेरो आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याचं समजतं. अपघातात मृत्यू आणि जखमी झालेले प्रवासी हे सर्वजण पुण्याचे रहिवाशी असल्याचं समजतं.

उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवर बोलेरो आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याचं समजतं. अपघातात मृत्यू आणि जखमी झालेले प्रवासी हे सर्वजण पुण्याचे रहिवाशी असल्याचं समजतं. हा अपघात यमुना एक्सप्रेस-वे वर गुरुवारी पहाटे 5 वाजता जेवार टोल प्लाझाजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे 5 वाजता जेवार टोल प्लाझाजवळ झाला. अपघातानंतर सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या दोघांवर कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एका बोलेरो कारनं डम्परला पाठीमागून धडक दिली. या धडकेत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचं वृत्त समजताच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयानं ट्वीट करत म्हटलं आहे की, “उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यमुना एक्सप्रेस-वेवर दोन वाहनांमधील अपघातात मृत्यू झालेल्यांप्रती शोक संवेदना प्रकट केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत की, जखमींवर योग्य ते उपचार करावेत आणि मदत करावी.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. “मथुरेतील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. यासोबतच मी जखमींना लवकरात लवकर बरे होवो ही कामना करतो.”, असं म्हटलं.


हेही वाचा – जितेंद्र नवलानींना देशाबाहेर जाण्यास मदत, संजय राऊतांचा गंभीर आरोप