Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Covid-19: रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी क्वारंटाईन

Covid-19: रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी क्वारंटाईन

प्रियंका गांधी यांच्या पतीला कोरोना झाल्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाईन करून घेतल्याने त्यांच्या सर्व प्रचारसभा रद्द

Related Story

- Advertisement -

देशातील प्रसिद्ध असणारे उद्योजक आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती प्रियंका गांधींनी एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे. तर प्रियंका गांधींनी देखील कोरोनाची चाचणी केली होती सुदैवाने त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी त्यांनी स्वतःला सेल्फ आयसोलेट केले असल्याचे सांगितले आहे. प्रियंका गांधींच्या पतीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेला आसाम दौरा रद्द केल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, प्रियंका गांधींनी एक व्हिडिओ करून याबाबतच माहिती ट्विट केली आहे. ‘कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्याने मला आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेला आसाम दौरा मला रद्द करावा लागत आहेत. काल माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे मला प्रचाराला येता येणार नाही. तरीही काँग्रेसचा विजय होईल, अशी मला आशा आहे,’

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी आज आसाममध्ये तीन सभा घेणार होत्या. प्रियंका दुपारी १२ वाजता गोलपारा पूर्व, गोलकगंज येथे दुपारी दीड वाजता आणि सरुखेत्री येथे दुपारी साडेतीन वाजता जाहीर सभा घेणार होत्या. मात्र आता प्रियंका गांधी यांचे पती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आणि त्या स्वतः आयसोलेट असल्याने त्यांना हा आसाम दौरा रद्द करणं भाग पडलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ८१ हजार ४६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५० हजार ३५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाख ३ हजार १३१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६३ हजार ३९६ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १५ लाख २५ हजार ३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ६ लाख १४ हजार ६९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.


- Advertisement -