घरट्रेंडिंगCorona Effect: अरे बापरे! डिग्री घेण्यासाठी विद्यार्थ्यांऐवजी पोहचले रोबोट्स!

Corona Effect: अरे बापरे! डिग्री घेण्यासाठी विद्यार्थ्यांऐवजी पोहचले रोबोट्स!

Subscribe

या जपानच्या युनिव्हर्सिटीने ग्रॅज्युएशनचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी हाय-टेक पद्धतीचा वापर केला आहे.

जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. जपानमध्ये कोरोना विषाणूमुळे स्प्रिंग ग्रॅज्युएशन कार्यक्रम रद्द करण्यात आला. मात्र विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन, बिझिनेस ब्रेकथ्रू युनिव्हर्सिटीने हाय-टेक पद्धत स्वीकारली. स्प्रिंग ग्रॅज्युएशन कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्याऐवजी चक्क रोबोट डिग्री घेण्यास उपस्थितीत राहिले.

- Advertisement -

या कार्यक्रमात हे रोबोट ग्रॅज्युएशनची कॅप आणि गाऊन घालून उपस्थिती राहिले होते. घरी बसलेल्या विद्यार्थी या रोबोना कंट्रोल करत होते. रोबोटच्या चेहऱ्यावर टॅबलेट लावले होते. टॅबलेट फोनच्या स्क्रीनवर ते ते विद्यार्थी दिसले.

- Advertisement -

आतापर्यंत जपानमध्ये ६ हजार ९३८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १३२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. देशात अनेक ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली आहे पण लॉकडाऊन नाही. अशा परिस्थितीत लोक कामावर जात आहेत. दरम्यान या युनिव्हर्सिटीला आशा आहे की, अशी पद्धत इतर संस्थामध्येही अवलंबली जाईल.

जगभरातील आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १७ लाख ९५ हजार ९७८वर पोहोचली आहे. यापैकी १ लाख ९ हजार ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक मृत्यू आता इराण नंतर अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.


हेही वाचा – Corona: देशात २४ तासांत ९०९ नवे रुग्ण, ३४ मृत्यू; एकूण आकडा ८३५६!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -