घरताज्या घडामोडीAntibody Cocktail: भारतात कोरोनावर आता कॉकटेल उपचार सुरू; एका डोसची किंमत ऐकून...

Antibody Cocktail: भारतात कोरोनावर आता कॉकटेल उपचार सुरू; एका डोसची किंमत ऐकून व्हाल हैराण

Subscribe

देशात सध्या कोरोनावर उपचार म्हणून वेगाने लसीकरण केले जात आहे. पण आता देशात कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी कॉकटेल ड्रगच्या वापराला सुरुवात झाली आहे. सोमवारी अँटीबॉडी कॉकटेल ड्रग देशात लाँच केले होते. पण सध्या या कोरोनावरील कॉकटेल ड्रग किंमतीवरून चर्चा सुरू आहे. कारण या कॉकटेल ड्रगची किंमत तितकीच हैराण करणारी आहे.

रॉश इंडिया आणि सिप्लाच्या या ड्रगच्या प्रति डोसची किंमत ५९ हजार ७५० इतकी आहे. ड्रगच्या एका पॅकेटमध्ये दोन डोस असतात. ज्याची एकूण किंमत १ लाख १९ हजार ५०० रुपये ठेवली आहे. प्रत्येक एका पॅकेटमध्ये दोन रुग्णांवर उपचार केला जाईल शकतो. Casirivimab आणि Imdevimab या दोन प्रकारच्या अँटीबॉडीजचे कॉकटेल करून हे ड्रग तयार करण्यात आले आहे. एका रुग्णाला एका डोसमध्ये १२०० मिली ग्रॅम डोस, ज्यामध्ये Casirivimab ६०० मिलिग्रॅम आणि Imdevimab ६०० मिलिग्रॅम असेल.

- Advertisement -

हरयाणात दिला गेला पहिला कॉकटेल ड्रग

हरयाणाच्या ८४ वर्षीय मोहब्बत सिंह देशातील पहिले असे रुग्ण ठरले आहेत, ज्यांनी अँटीबॉडी कॉकटेल ड्रग घेतले आहे. मोहब्बत सिंह गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना मंगळवारी रॉश इंडिया आणि सिप्लाचे अँटीबॉडी कॉकटेल ड्रग्ज दिले गेले. रुग्णालय प्रशासनाने सिंह यांना बुधवारी डिस्चार्ज दिला आहे.

कॉकटेल ड्रग कोणावर असरदार?

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णंना हे औषध दिले जाऊ शकते. प्रौढ आणि १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी, ज्यांच्यामध्ये सौम्य आणि मध्यम लक्षणे आहेत, ज्यांना गंभीर होण्याचा धोका आहे आणि त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही, अशा रुग्णांना कॉकटेल ड्रग दिले जाऊ शकते. जास्त धोका असलेल्या रुग्णांची स्थिती बिकट होण्यापूर्वी दिसून आले की, त्यांचा धोका कमी झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – DGCA : विदेशात जाणाऱ्यांनो जरा थांबा, ३० जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -