Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Video: अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती निवासस्थानी सुरू होते नमाज पठण, अचानक सुरू झाले रॉकेट...

Video: अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती निवासस्थानी सुरू होते नमाज पठण, अचानक सुरू झाले रॉकेट हल्ले

Related Story

- Advertisement -

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रॉकेट हल्ला झाल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाच्या हाकेच्या अंतरावर आज, मंगळवारी बकरी ईदचे नमाज पठण सुरू होते, त्यादरम्यान काही अंतरावर रॉकेट हल्ला झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आतापर्यंत या हल्ल्यात कोणतीही जीवतहानी झाल्याची माहिती समोर आली नाही आहे. पण या हल्ल्याचा निशाणा राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या हल्ल्यानंतर असे म्हटले जात आहे की, हा हल्ला तालिबानकडून केला गेला असून तो आता काबुलच्या खूप जवळ पोहोचला आहे. टोलो न्यूजच्या माहितीनुसार, नमाज सुरू होताच हा रॉकेट हल्ला झाला. तर सुत्रांच्या माहितीनुसार, हे रॉकेट काबुलच्या परवान-ए जिल्ह्यातून फायर केले गेले होते जे उत्तरकडे स्थित आहे. काबुलच्या के बाग इ अली मरदान आणि चमन इ होजोरी भागात हल्ला झाला. घटनास्थळावरून हाकेच्या अंतरावर राष्ट्रपती अशरफ घनी यांचे निवासस्थान आहे. याच दरम्यान अशरफ गनी म्हणाले की, ‘अफगान लोकांना आपण एकजुट असल्याचे सिद्ध केले पाहिजे.’

- Advertisement -

पुढे अशरफ घनी म्हणाले की, ‘तालिबानने दाखवून दिले की, त्यांना शांता राहायचे नाही आहे. आता आम्ही या आधारावर निर्णय घेऊ. लोकांच्या इच्छाशक्तीमुळे पुढील तीन ते सहा माहिन्यात परिस्थिती सुधारेल. याबाबत त्यांनी तालिबान यांना सवाल केला की, त्यांच्या जवळ अफगान लोकं विशेष म्हणजे महिल्यांच्या प्रति सकारात्मक प्रतिक्रिया आहे. रॉकेट हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलाने परवान-ए-सेच्या पूर्ण भागात घेराव घातला असून शोध कार्य सुरू आहे.’


- Advertisement -

हेही वाचा – US Fire: अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये भीषण अग्नितांडव; तीन लाख एकर जमीन आगीच्या विळख्यात


 

- Advertisement -