राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत रोहित वेमुलांच्या आई आणि पूजा भट्ट सहभागी

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. देगलुर येथे ही यात्रा येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदी दिग्गज नेते या यात्रेत सहभागी होणार आहेत.

हैदराबाद – काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. 2024 च्या निवडणुकांच्या (2024 election) पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेमार्फत देशभरात काँग्रेसकडून पक्षबांधणी सुरु आहे. राहुल गांधींची ही पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यापूर्वी तेलंगणामध्ये (telangana) भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना साथ देण्याकरता अभिनेत्री आणि सिनेनिर्माती पूजा भट्ट आणि रोहित वेमुला यांच्या मातोश्री सहभागी झाल्या होत्या. याबाबत काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

हेही वाचा – राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याला गंभीर दुखापत; धक्काबुक्कीमुळे घडला प्रकार

अभिनेत्री सिनेनिर्मातील पूजा भट्ट आज बुधवारी, भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती. राहुल गांधींसह ती काही वेळ चालली. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. पूजा भट्ट आणि राहुल गांधी यांचा फोटो काँग्रेसने ट्विट केला आहे.


जादीवादातून होत असलेल्या अन्यायामुळे आत्महत्या केलेल्या रोहित वेमुला यांच्या आईही या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. मंगळवारी तेलंगणातील हैदराबादेत ही भेट झाली. राहुल गांधी यांनी ट्विट करून या भेटीचे फोटो शेअर केले आहे. रोहित वेमुला हे सामाजिक भेदभाव आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षातील माझे प्रतिके होते आणि राहतील, असं राहुल गांधी गांधी म्हणाले. तसंच, रोहित यांच्या आईंना भेटून मला एक धाडस मिळालं, मनाला शांती मिळाली, असं राहुल गांधी म्हणाले.


भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. देगलुर येथे ही यात्रा येणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदी दिग्गज नेते या यात्रेत सहभागी होणार आहेत.

नितीन राऊत यांना धक्काबुक्की

राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हैदराबादमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. राहुल गांधींच्या सोबतच नितीन राऊत (nitin raut) यात्रेत चालत होते. भारत जोडो यात्रेला (bharat jodo yatra) मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठवण्यासाठी पोलीस सुद्धा प्रयत्न करत होते. राहुल गांधी यांच्या पासून पोलीस लोकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान या सगळ्या गदारोळात तेलंगणातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने नितीन राऊत यांना जोरात ढकलले. नितीन राऊत यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.