देशातील 71 हजार तरुणांना आज मिळणार मोठं गिफ्ट; PM मोदी रोजगार मेळाव्यातून देणार नियुक्तीपत्र

rojgar mela pm narendra modi to distribute 71000 appointment letters to new recruits today

देशातील 71 हजार तरुणांचं आज एक मोठ गिफ्ट मिळणार आहे. आज अधिकृतपणे पीएम मोदी रोजगार मेळाव्यातून या तरुणांना नियुक्तीपत्र मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम मोदी रोजगार मोहिमेअंतर्गत 10 लाख कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याचं उद्दिष्ठ ठेवलं आहे. यातील 71 हजार तरुणांना आज नियुक्त पत्र सुपुर्द केली जातील. पीएमओ म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने याबाबत एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तरुणांना संबोधित करणार आहे.

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी हा रोजगार मेळावा महत्त्वाचं पाऊल असल्याचं पीएमओने म्हटलं आहे. हा कार्यक्रम आज (20 जानेवारी) सकाळी 10.30 वाजता होणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

पीएमओने सांगितलं की, देशभरातून निवडलेल्या तरुणांची भारत सरकारअंतर्गत कनिष्ठ अभियंता, लोको पायलट, तंत्रज्ञ, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, प्राप्तिकर निरीक्षक, शिक्षक, नर्स, डॉक्टर, सुरक्षा अधिकारी, PA, MTS विविध पदांवर नियुक्त केली जाईल.

या कार्यक्रमादरम्यान नवनियुक्त कर्मचारी कर्मयोगी प्रारंभ मोड्यूलबाबत त्यांचे अनुभवही सांगतील. कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल हा विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन इंडक्शन कोर्स आहे. यामध्ये सरकारी कामगारांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणी नीतिमत्ता, सचोटी आणि मानवी संसाधन धोरणे यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘रोजगार मेळावा’ सुरू केला होता. एका कार्यक्रमात त्यांनी 75,000 नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली होती.


CRPF जवानांना सोशल मीडिया वापरासाठी ‘हे’ नवे नियम लागू