Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशRokhthok : आज भयाचे सावट कुणावर नाही? संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Rokhthok : आज भयाचे सावट कुणावर नाही? संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Subscribe

साहित्यबाह्य कामांनी हे संमेलन गाजत आहे. 21, 22, 23 फेब्रुवारीस हे संमेलन दिल्लीच्या ताल कटोरा मैदानावर सुरू आहे. त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ते विज्ञान भवनात. ताल कटोरात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. त्यामुळे उद्घाटनाची जागाच बदलली.

(Rokhthok) मुंबई : डॉ. तारा भवाळकर या दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या ते योग्यच आहे. “साहित्यिकांवर भयाचे सावट नको. लोकशाहीच्या दोन बाजू असतात. ऐकणे आणि ऐकवणे,” असे विचार डॉ. तारा भवाळकर यांनी मांडले, पण आज भयाचे सावट कुणावर नाही? हा प्रश्न आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य काय, तर नव्या संसदेपासून म्हणजे लोकशाहीच्या मंदिरापासून ग्रंथदिंडी निघाली. ज्या मंदिरापासून दिंडी निघाली ते मंदिर म्हणजे आज लोकशाहीचा कोंडवाडा बनले आहे आणि त्यामुळे सारा देश गुदमरला आहे. लेखक, कवी, कलावंत, व्यंगचित्रकार, स्टॅण्डअप कामेडियन यांच्यावर बंधने आहेत. सरकारविरुद्ध बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, असे बोलणाऱ्यांना तसेच लिहिणाऱ्यांना सरळ तुरंगात पाठवले जाते. रशियात पूर्वी स्टालिन आणि आता पुतीन यांच्या काळात नेमके हेच घडत आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut’s attack on Modi government regarding Sahitya Samelan)

सरकारशी तडजोडी करून कृपादान मिळविण्याच्या रांगेत कलावंत आणि साहित्यिक सगळ्यात पुढे आहेत. तसे नसते तर, साहित्य संमेलनाच्या मंचावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मान केला गेला नसता. अर्थात राजकारण्यांच्या मदतीशिवाय तसेच सत्ताधाऱ्यांच्या निधीदानाशिवाय आपले साहित्य सोहळे होत नाहीत. त्यामुळे साहित्यिकांच्या मंचावर राजकारण्यांचा वावर जास्त दिसतो. तो या वेळी दिल्लीत जास्त दिसला, असे सांगत संजय राऊत यांनी, ”साहित्य संमेलनाच्या मुख्य मांडवास नथुराम गोडसेंचे नाव द्या” ही मागणी काही लोकांनी केली आणि त्यासाठी आयोजकांवर दबाव आणला. एकाही साहित्यिकाने याबाबत निर्भय आणि उघड भूमिका घेतली नाही, अशी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – Rokhthok : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा उघडपणे राजकीय वापर, संजय राऊतांचा आरोप

साहित्यबाह्य कामांनी हे संमेलन गाजत आहे. 21, 22, 23 फेब्रुवारीस हे संमेलन दिल्लीच्या ताल कटोरा मैदानावर सुरू आहे. त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ते विज्ञान भवनात. ताल कटोरात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. त्यामुळे उद्घाटनाची जागाच बदलली. महाराष्ट्राचे लेखक, कवी, ग्रंथ पोते, श्रोते यांच्यापासून आपल्या पंतप्रधानांना काय धोका असणार? असा प्रश्नही त्यांनी केला.

दिल्लीच्या विधानसभा विजयानंतर पंतप्रधान हे भाजपा मुख्यालयात गेले. तेथे प्रचंड गर्दीत विजयाचा जल्लोष साजरा केला. त्यापेक्षा साहित्य संमेलनाची गर्दी अधिक शिस्तबद्ध मानायला हवी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिरवण्यासाठी मोदी हे अहमदाबादच्या वल्लभभाई पटेल स्टेडियमवर गेले. तेथे तर लाखोची गर्दी होती, पण ताल कटोरा मैदानावरील प्रत्यक्ष साहित्य संमेलन टाळून मोदी हे विज्ञान भवनात गेले. आता त्यावर टीका करण्यात अर्थ नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दिल्लीचे संमेलनच हायजॅक

उद्घाटक पंतप्रधान मोदी आणि स्वागताध्यक्ष शरद पवार हे झाल्याने निदान राजकीय समतोल साधला. शरद पवार हे निदान साहित्यिक, कलावंतांशी संबंध ठेवतात, लिहितात आणि वाचतात. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा आहे, पण आणीबाणीच्या काळात राजकारण्यांनी संमेलनात येऊ नये तसेच संमेलन नासवू नये, अशी भूमिका घेणाऱ्यांत दुर्गाबाई भागवत पुढे होत्या आणि त्यांनी समांतर साहित्य संमेलन घेतले. तेव्हा दुर्गाबाईंचे समर्थन करणाऱ्यांत तेव्हाच्या जनसंघाचे लोक जास्त होते, पण आता त्यांनी दिल्लीचे संमेलनच हायजॅक केले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Raut Vs Shinde : ही साहित्य संमेलनातली घुसखोरी, संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र