हे बूट वापरा आणि कोरोनाला घाला आळा…सोशल डिस्टन्सिंगसाठी उत्तम पर्याय!

हे बूट घातल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल आणि कोरोनाव्हायरसपासूनही बचाव होईल

कोरोनापासून बचाव करण्यासाठी खास बूट

कोरोनापासून वाचायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे. मात्र आज सगळीकडेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडलेला दिसतो. कित्येक लोक त्याचं उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. नवनवीन शक्कल लढवल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी छत्र्यांचा उपाय शोधून काढला आणि तो काहीप्रमाणात हिटही झाला. आता खास बूटाची निर्मिती करण्यात आली आहे.

कोरोनासाटी यांनी तयार केले खास बूट

 

ट्रान्सिल्व्हेनिया शहरातील शू मेकर ग्रिगोर लूप यांनी हे बूट तयार केलेत. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी हे बूट तयार केलेत. हे बूट घातल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल आणि कोरोनाव्हायरसपासूनही बचाव होईल. ५५ वर्षीय लूप यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बूट बनवण्याचं काम सुरू केलं होतं. गेल्या ३९ वर्षांपासून ते लेदरचे बूट बनवत आहेत.

आपण तयार केलेल्या बूटाविषयी बोलताना ग्रिगोर म्हमाले की, “एक दिवस जेव्हा मी बाजारात गेले होते. तेव्हा मी पाहिलं की लोकं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही आहेत. त्यावेळी मी असे लांब आकाराचे बूट तयार करण्याचा निर्णय घेतला. हे बूट घालणारी व्यक्ती समोरील व्यक्तीपासून जवळपास दीड मीटर दूर राहते. एक जोडी बूट बनवण्यासाठी दोन दिवस लागतात. त्यासाठी जवळपास आठ हजार रुपये खर्च येतो”


हे ही वाचा – महाराष्ट्रात कोरोनावरील SARS COV- 2 या लस चाचणीचा होणार ३० माकडांवर प्रयोग!