घरदेश-विदेशCoronaVirus: कोरोनानं घेतला 'रोटी बँक' संस्थापक किशोर कांत यांचा बळी

CoronaVirus: कोरोनानं घेतला ‘रोटी बँक’ संस्थापक किशोर कांत यांचा बळी

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना उत्तरप्रदेशातील वाराणसी येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. रोटी बँकेची स्थापना करणारे समाजसेवक किशोर कांत तिवारी यांचे गुरुवारी कोरोनाने निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर किशोर कांत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश दिला. त्याचा हा शेवटचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाराणसीमध्ये समाजसेवा करणारे किशोर कांत तिवारी यांनी रोटी बँकच्या माध्यमातून भुकेल्यांचे पोट भरले. मात्र देशभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या विळख्यात किशोर कांत तिवारी यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक व्हिडिओ केला होता. जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकांना कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

गेल्या ७ दिवसांपुर्वी किशोर कांत यांनी केलेल्या व्हिडिओत कोरोनाच्या विळख्यात ते स्वतः अडकले आहे, बनारसमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांना टायफॉईड असल्याचे सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर हे आपले कुटुंब आणि मित्र रोशन पटेल यांच्यासह भाड्याच्या घरात राहत होते. बीएचयूचे प्राध्यापक आणि सध्या झारखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू पीके मिश्रा हे मिळून रोटी बँक चालवत होते.

किशोर कांत तिवारी यांनी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, त्यांनी सर्व तपासण्या केल्या आहेत, फक्त टाइफॉइड आहे आणि लवकरच मी बरा होईल, असे सांगितले होते. मागील १० दिवसांपासून त्यांना ताप होता, अचानक त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती, अखेर त्यांनी गुरूवारी अखेरचा श्वास घेतला.

बघा व्हायरल व्हिडिओ

- Advertisement -


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -