घरताज्या घडामोडीपंतप्रधान के.पी.ओली आणि रॉ प्रमुखाच्या भेटीनंतर नेपाळमध्ये गदारोळ

पंतप्रधान के.पी.ओली आणि रॉ प्रमुखाच्या भेटीनंतर नेपाळमध्ये गदारोळ

Subscribe

नेपाळने उत्तराखंडमधील भारतीय भागांचा आपल्या नकाशात समावेश केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध प्रचंड तणाले गेले होते. पण आता हळूहळू दोन्ही देशांमधले संबंध पूर्ववत होताना दिसत आहे. पण यादरम्यान नेपाळचे पंतप्रधान के.पी शर्मा ओली नव्या वादात सापडले आहे. अलीकडेच नेपाळच्या पंतप्रधान यांनी रिसर्च अँड Analysis विंगचे प्रमुख सामंत कुमार गोयल यांची भेट घेतली. रिसर्च अँड Analysis ही भारताची प्रमुख गुप्तचर यंत्रणा आहे. त्यामुळे नेपाळच्या पंतप्रधांनाच्या भेटीची माहिती समोर आल्यानंतर नेपाळमध्ये गदारोळ माजला आहे. ओली यांच्यावर तीन माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे.

या भेटीसाठी बुधवारी रॉचे एक पथक विशेष विमानाने काठमांडूला गेले होते. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत नेपाळच्या पंतप्रधानांसोबत बैठक सुरू होती. दोन तासांपेक्षा जास्त वेळ या बैठकीत चर्चा सुरू होती. या दौऱ्यात रॉ प्रमुख आणि टीमने विरोधी पक्षाचे नेते शेर बहादूर देउबा, माजी पंतप्रधान बाबूराम भट्टाराय यांची देखील भेट घेतली.

- Advertisement -

पण या भेटीवरून दुसऱ्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना पंतप्रधानांनी भेटणे, हे अयोग्य आणि आक्षेपार्ह आहे, अशी टीका ओली यांच्यावर पुष्पा कमाल दहल प्रचंड, झालानाथ खानाल आणि माधव कुमार नेपाळ या माजी पंतप्रधानांनी केली आहे. तसेच या दोन तासापेक्षा जास्त वेळ झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली? याची माहिती देण्यास या नेत्यांनी सांगितले आहे. मात्र भारत आणि नेपाळ यांच्यातील पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.


हेही वाचा – दिलासादायक! देशात ७३ हजाराहून अधिक रूग्णांनी केली कोरोनावर मात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -