घरताज्या घडामोडीUP Assembly Election 2022: आरपीएन सिंह यांच्या हाती कमळ, अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी

UP Assembly Election 2022: आरपीएन सिंह यांच्या हाती कमळ, अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी

Subscribe

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते आरपीएन सिंह यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आरपीएन सिंह यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पाठवला आहे.

आरपीएन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा केली आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर सिंह यांनी जेपी नड्डा यांच्यासोबत पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद दिलं आहे. पीएम मोदींना अनेक काळापासून राष्ट्रनिर्माणासाठी अधिक कार्य केलंय. दुसरीकडे भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

३२ वर्षांपर्यंत काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणाने काम केलं. परंतु हा पक्ष पहिल्यासारखा राहिलेला नाहीये. त्यामुळे त्यांना भाजपात प्रवेश करण्यासाठी पहिल्यासापासून सांगत असल्याची चर्चा रंगत होती. आरपीएन सिंह मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आरपीएन सिंह यांना भाजपात सदस्यता मिळवून दिली आहे.

- Advertisement -

आरपीएन सिंह यांची राजकीय कारकीर्द काय?

१९९६, २००२ आणि २००७ च्या विधानसभा निवडणुकीत पडरौना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आरपीएनचे तीन वेळा आमदार राहीले आहेत. तसेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून ते खासदार झाले. झारखंडमध्ये ते काँग्रेसचे प्रभारी नेते होते. तसेच यूपीमध्ये युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहीले आहेत.

आरपीएन सिंह यांनी ट्विट करत त्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. संपूर्ण देश प्रजासत्ताक दिवसाच्या तयारीला लागला आहे. दुसरीकडे मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. जय हिंद, असं आरपीएन सिंह यांनी म्हटलं.


mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -