Homeदेश-विदेशRRB : रेल्वेच्या 'ग्रुप डी'मध्ये भरती, नियमांमध्ये केले मोठे बदल; वाचा -

RRB : रेल्वेच्या ‘ग्रुप डी’मध्ये भरती, नियमांमध्ये केले मोठे बदल; वाचा –

Subscribe

ग्रुप डी (लेव्हल-1)च्या सुमारे 32 हजार पदांवर भरती केली जाणार आहे. याची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.

(RRB) नवी दिल्ली : रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) ग्रुप डी (लेव्हल-1) पदांवर भरती करण्यात येत आहे. यासंबंधीच्या सूचना रेल्वे भरती बोर्डाकडून सर्व झोन्सना पाठविण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक असलेल्या काही नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेषत: किमान शैक्षणिक पात्रता निकष शिथिल केले आहेत. (Major Changes in Group D Recruitment Rules in Railways)

ग्रुप डी (लेव्हल-1)च्या सुमारे 32 हजार पदांवर भरती केली जाणार आहे. याची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीची शॉर्ट नोटिस भारत सरकारच्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. RRB ग्रुप डी परीक्षा सीबीटी मोडमध्ये घेतली जाईल. अर्ज करण्यासाठी, सामान्य/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये भरावे लागतील (सीबीटीमध्ये सहभागी झाल्यावर 400 रुपये परत केले जातील) आणि SC/ ST/ EBC/ महिला/ ट्रान्सजेंडर यांना 250 रुपये भरावे लागतील (सीबीटीमध्ये सहभागी झाल्यावर पूर्ण शुल्क परत केले जाईल).

हेही वाचा – Plastic Ban : प्रतिबंधित प्लास्टिक वापरल्यास आता होणार कारवाई; काय आहेत आदेश?

नियमांमध्ये केलेले बदल

रेल्वे भरती बोर्डाने या पदासाठी असलेल्या नियमांत काही बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, आता साधे 10वी पास उमेदवार गट डी पदांसाठी अर्ज करू शकतील. यापुढे ग्रुप डी पदाच्या उमेदवारांसाठी आयटीआय डिप्लोमा अनिवार्य नसेल. यापूर्वी, तांत्रिक विभागांसाठी अर्ज करताना, इयत्ता 10वी उत्तीर्ण असण्याबरोबरच नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगद्वारे (NCVT) दिलेल्या एनएसी किंवा आयटीआय डिप्लोमा अनिवार्य होता. एनएसी किंवा आयटीआय डिप्लोमा नसलेले उमेदवार अर्ज करू शकत नव्हते.

गेल्या महिन्यांतील विविध रेल्वे भरतींप्रमाणे, ग्रुप डी भरतीच्या नोटीसमध्येही कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट दिल्याचा उल्लेख आहे. कोविड महामारीमुळे, ग्रुप ड भरतीसाठी कमाल वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. त्यानुसार कमाल वयोमर्यादा 33 ऐवजी 36 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ही सवलत फक्त याच वेळेसाठी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (RRB : Major Changes in Group D Recruitment Rules in Railways)

हेही वाचा – Crime News : धक्कादायक! नारायण राणेंच्या वापर करून महिलेची 45 लाखांची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?