घरट्रेंडिंगRRB NTPC 7th Exam 2021: रेल्वे भरती मंडळाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून...

RRB NTPC 7th Exam 2021: रेल्वे भरती मंडळाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी असणार परीक्षा

Subscribe

विविध नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC ग्रेजुएट आणि अंडरग्रेजुएट) पदांसाठी रेल्वे भरती परीक्षेचा सातवा किंवा शेवटचा टप्पा 23 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने दिली. मंत्रालयाने म्हटले की, कंप्यूटर बेस टेस्ट (सीबीटी -1) चा 7 वा टप्पा 23, 24 आणि 26 जुलै म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि सोमवारी नियोजित केले आहे.

76 शहरांतील साधारण 260 केंद्रांवर होणार परीक्षा

RRB NTPC ची परीक्षा देशभरातील 76 शहरांतील साधारण 260 केंद्रांवर कोविड 19 प्रोटोकॉल अंतर्गत घेतली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, सीबीटी देशभरातील साधारण 76 शहरांतील 260 केंद्रांमध्ये एसडी-50 मॉड्यूलचा वापर करून कठोर कोविड -19 प्रोटोकॉल अंतर्गत केंद्रांवर उपलब्ध असलेल्या 50 % क्षमतेचा वापर करण्यास परवानगी देत आहे, जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जाईल. ” रेल्वे मंत्रालयाच्या मते, पहिल्या टप्प्यातील कंप्यूटर बेस टेस्टमध्ये एकूण 2.78 लाख उमेदवार या परीक्षेला बसणार आहे.

- Advertisement -

ताज्या अपडेटसाठी आरआरबीचे संकेतस्थळाला भेट द्या

परीक्षेचे शहर आणि तारीख पहाण्यासाठी आणि एससी / एसटी उमेदवारांसाठी विनामूल्य ट्रॅव्हलिंग अथॉरिटी डाउनलोड करण्यासाठीची लिंक परीक्षेच्या दहा दिवस आधी सर्व आरआरबी वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे ईडी आरडी बाजपेयी यांनी सांगितले. यासह, परीक्षा शहर आणि तारखेची माहिती लिंकमध्ये दिलेल्या परीक्षेच्या तारखेच्या चार दिवस आधी ई-मेल लेटर डाउनलोड करता येणार आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाने असे सांगितले की, उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या ताज्या अपडेटसाठी आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन भेट देता येणार आहे. कृपया अनधिकृत स्त्रोतांकडून दिशाभूल करून न घेण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.


चिंता करू नका, लॅम्बडा व्हेरियंटचा भारतात एकही रुग्ण नाही

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -