घरताज्या घडामोडीRRB NTPC: रेल्वे परीक्षेवरून हिंसक आंदोलन प्रकरणी खान सरांविरोधात एफआयआर दाखल, विद्यार्थ्यांना...

RRB NTPC: रेल्वे परीक्षेवरून हिंसक आंदोलन प्रकरणी खान सरांविरोधात एफआयआर दाखल, विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप

Subscribe

रेल्वे परीक्षेवरून हिंसक आंदोलन प्रकरणी कोचिंग क्लासचे प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच अन्य कोचिंग क्लासच्या शिक्षकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. NTPC Resultबाबत बिहारमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना भडकावल्याची आरोपीखाली पटना येथील पत्रकार नगर पोलीस ठाण्याच कोचिंग क्लास शिक्षक खान सर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटनाचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक मानवजीत सिंह ढिल्ल यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार जीआरपी आणि आरपीएफमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

राजेंद्र नगर टर्मिनलवर मंगळवारी घातलेल्या गोंधळामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या किशन कुमार, विक्रम कुमार आणि रोहित कुमार या विद्यार्थ्यांच्या वक्तव्यानुसार किंवा खुलासानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सर खान व्यतिरिक्त एसके झा सर, नवीन सर, अमरनाथ सर, गगन प्रताप सर, गोपाल वर्मा सर आणि बाजार समितीचे विविध कोचिंग ऑपरेटर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात भारतीय दंड कलमानुसार १४७, १४८, १४९, १५१, १५२, १८६, १८७, १८८, ३३०, ३३२, ३५३, ५०४, ५०६ आणि १२० (ब) अन्वयेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

इन्स्टिट्यूटवर कारवाई करण्यास सुरूवात

राज्यातील विविध शहरं आणि जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून RRB NTPCच्या निकालाबाबत गोंधळ सुरू आहे. निकालात हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. संतप्त झालेल्या उमेदवारांमुळे सर्वाधिक नुकसान रेल्वेचे झाले आहे. त्यामुळे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच काही रेल्वे गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले होते. याचा सर्वाधिक फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. दुसरीकडे पटना जिल्हा प्रशासनाने कोचिंग क्लासचे शिक्षक खान सर आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

रेल्वे परीक्षा निकालात घोटाळ्याचा आरोप

संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांना रिकामी ट्रेन पेटवली आहे. तसेच दगडफेक आणि जाळपोळ विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. गया स्टेशनवर ट्रेन पटवण्यात आली आहे. त्याचसोबतच रेल्वे प्रशासनाबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. तसेच आता या प्रकरणाला हिंसक वळण लागलं आहे.

- Advertisement -

कोण आहेत खान सर?

पटनामध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षक देणाऱ्या खान रीसर्च सेंटरचे संचालक आहेत. पटना के खान सर या नावानं सोशल मीडियावर ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं यूट्यूब चॅनेल असून एक कोटीहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. स्पर्धा परीक्षांचा विषय सोपा करून सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे. बिहारी लहेजा वापरत शिकवलेल्या विषयांना अनेकांची पसंती मिळत आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट

खान सरांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. उत्तर प्रदेशातील आंदोलक विद्यार्थ्यांची ‘संपत्ती’ जप्त करण्याचे आदेश योगी सरकारने दिलेत. त्यांच्याकडे संपत्ती असती तर नोकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरले असते का? बहुधा त्यांची पेनं, पुस्तकं आणि पदव्या जप्त करतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.


हेही वाचा : Lasith Malinga is back: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर लसिथ मलिंगा प्रशिक्षकांच्या भूमिकेत पुनरागमन करणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -